27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरक्राईमनामाजी- २० च्या यशानंतर जळजळ; अनंतनाग हल्ल्यात पाकिस्तानचा हात

जी- २० च्या यशानंतर जळजळ; अनंतनाग हल्ल्यात पाकिस्तानचा हात

कॉल इंटरसेप्शनवरून उलगडा

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमधील हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी राजौरीमध्ये हल्ला झाला होता. दरम्यान, अनंतनाग आणि राजौरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे आता उघड झाले आहे.

जिहादी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ल्यामागे पाकिस्तानचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या पाच दिवसातील डिफेन्स इंटेलिजन्सच्या कॉल इंटरसेप्शनवरून याचा उलगडा झाला आहे. या हल्ल्यांमागे पाकिस्तान असल्याचे आता उघड झाले आहे.

भारताच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या जी-२० च्या यशामुळे पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानने आखली होती, जी- २० बैठकीपासून पासून पाकिस्तानी लष्कर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. जम्मू- काश्मीरमध्ये दोन दिवसांत दोन मोठे हल्ले झाले आहेत.

काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सुरक्षा दल आणि लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धनौत आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट शहीद झाले. तर, चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. तसेच राजौरी येथे लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतीपोटी पाकिस्तानकडून सीमेपलीकडून हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना पाठवले जात असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.

कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला.

हे ही वाचा:

आधी ‘गदर २’ पाहा तरी…दिग्दर्शकाचा नसिरुद्दीन शहा यांना सल्ला

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा