32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरअर्थजगतपाकिस्तानच्या फाटक्या झोळीला बागेचा सहारा

पाकिस्तानच्या फाटक्या झोळीला बागेचा सहारा

Google News Follow

Related

पाकिस्तानची कंगाल अवस्था जगासमोर उघडी पडली आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि मलेशिया यासारख्या विविध देशांकडून पाकिस्तानने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानकडून या देशांनी आपले पैसे परत मागायला सुरूवात केली आहे. नुकतेच मलेशियाने पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईनचे विमान पैसे न भरल्यामुळे जप्त केले होते.

पाकिस्तानच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी सरकार नाना तऱ्हेचे उपाय करत आहे. त्यापैकी एक म्हणजे इस्लामाबाद या राजधानीच्या शहरातील एक बगीचा गहाण ठेवून ₹५०० बिलीयन उभे करण्याचा पाकिस्तानी सरकारचा प्रयत्न आहे.

मंगळवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यात या तरतूदीचा समावेश करण्यात आला आहे.

ही बैठक व्हिडीयो कॉन्फरन्सच्या मार्फत होणार आहे. याची तयारी पंतप्रधानाच्या निवासस्थानी करण्यात आली आहे.

डॉन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सरकार ₹५०० बिलीयन उभे करण्यासाठी एफ-९ या विभागातील एक बगीचा गहाण ठेवणार आहे. त्याच्या आधारे बाँड विक्री करून पैसे उभे करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने याबाबत आधीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

यापूर्वी विविध रस्ते, इमारती गहाण ठेवून पाकिस्तान सरकारने पैश्यांची तजवीज केली होती. त्यांच्या आधारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाँड्स सरकारने काढले होते. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्याच मार्गाचा अवलंब करणार आहे असं दिसतं.

इस्लामाबादमध्ये असलेला एफ-९ बगीचा ७५९ एकरांत पसरलेला आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक हिरवळ असलेल्या स्थानांपैकी हा बगीचा एक आहे. या बगीच्याचे नाव ‘मदार- ए- मिलत फतिमा जिन्ना’ आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा