भारत आणि ब्रिटनने गुरुवारी (२४ जुलै) एका ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी केली, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापार दरवर्षी $३४ अब्जने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२० मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने एखाद्या देशासोबत केलेला हा सर्वात मोठा करार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात हा करार झाला. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष केयर स्टार्मर यांच्यात लंडनमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी झाली.
स्वाक्षरी समारंभानंतर पंतप्रधान मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना स्टार्मर म्हणाले की, एफटीएमुळे भारत आणि ब्रिटनला “मोठे फायदे” मिळतील. “हा एक असा करार आहे जो आपल्या दोन्ही देशांना मोठे फायदे देईल, वेतन वाढवेल, राहणीमान उंचावेल आणि काम करणाऱ्या लोकांच्या खिशात अधिक पैसे टाकेल. हे नोकऱ्यांसाठी चांगले आहे, व्यवसायासाठी चांगले आहे, जकात कमी करेल आणि व्यापार स्वस्त, जलद आणि सोपा करेल,” असे ते म्हणाले.
एका ट्विटमध्ये, स्टार्मर यांनी एफटीएला “महत्त्वाचा करार” म्हटले आणि म्हटले की या करारामुळे यूकेमध्ये नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. “भारतासोबतचा एक महत्त्वाचा करार म्हणजे यूकेमध्ये नोकऱ्या, गुंतवणूक आणि वाढ. यामुळे हजारो ब्रिटिश नोकऱ्या निर्माण होतील, व्यवसायांसाठी नवीन संधी उपलब्ध होतीलआणि काम करणाऱ्या लोकांच्या खिशात पैसे येतील. हाच आमचा कृतीशील बदलाचा आराखडा आहे,” असे त्यांनी एक्सवर लिहिले.
एफटीए हा भारताचा विकसित देशासोबतचा १० वर्षांहून अधिक काळातील पहिला मोठा द्विपक्षीय व्यापार करार आहे. २०१६ मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर आणि २०२० मध्ये अधिकृतपणे युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर युकेने स्वाक्षरी केलेला हा सर्वात महत्त्वाचा व्यापार करार आहे.
‘अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाला यश’
करार का महत्त्वाचा?
हिमाचल प्रदेश : बस दरीत कोसळून ७ ठार
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर कुलूपबंद मंदिर-गुरुद्वारा ४२ वर्षांनी उघडले!
इंग्लंड दौऱ्यात भारत पासा पलटू शकतो!
के. एल. राहुल इंग्लंडमध्ये १०००+ धावा करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत
काय स्वस्त-काय महाग ?
इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, सागरी उत्पादने, स्टील आणि धातू, व्हिस्की आणि दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात. त्याच वेळी, कृषी उत्पादने, कार आणि बाईक सारखी ऑटो उत्पादने आणि स्टील महाग होऊ शकतात.







