23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत...

पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत…

आता व्यवहार रुपयात, आखातात आयआयटी

Google News Follow

Related

रुपयांत व्यापार, अबुधाबीमध्ये आयआयटी वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचा एक दिवसीय दौरा केला. यात एक करार करण्यात आला असून दोन्ही देशांमध्ये आता डॉलरऐवजी रुपयांत व्यापार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एक दिवसीय दौऱ्यासाठी अबुधाबी येथे दाखल झाले आणि त्यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.

 

 

बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, दोन्ही नेत्यांनी सर्वसमावेशक चर्चा केली आणि स्थानिक चलनांमध्ये व्यापार व्यवहार सुरू करण्यासाठी, भारत आणि यूएईच्या जलदगती व्यवहार यंत्रणेला गती देण्यासाठी आणि आखाती देशात आयआयटी-दिल्ली कॅम्पस उघडण्यास सहमती दर्शविली. चर्चेनंतर पीएम मोदी यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. ‘यूएई दौऱ्याचे फलित. आपली राष्ट्रे आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या उद्देशाने अनेक मुद्द्यांवर एकत्र काम करत आहेत.

 

 

मी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे हार्दिक आदरातिथ्याबद्दल आभार मानतो,’ असे ट्वीट त्यांनी केले. भारताने यूएईसोबत केलेल्या करारानुसार आता दोन्ही देशांमधील व्यापार व्यवहार डॉलरऐवजी रुपयांत होऊ शकतील. त्यामुळे डॉलरचे रूपांतरण दूर करून व्यवहार खर्च कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळेल. दोन्ही देशांनी पैसे हस्तांतरण सुलभ भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि यूएईचे इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (IPP) यांना सहमती दर्शविली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, दोन करारांमुळे “सीमारहित व्यवहार आणि देयके शक्य होतील आणि अधिक आर्थिक सहकार्य वाढेल.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा

राहुल गांधी म्हणजे निराश ‘राजपुत्र’

ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय

ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात आखाती देशात आयआयटी दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी दोन्ही देशांच्या मंत्रालयांनी शनिवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या ऐतिहासिक करारामुळे भारताच्या शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होत आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटद्वारे केले. पंतप्रधान मोदींनी शनिवारी सीओपी २८चे अध्यक्ष-नियुक्त सुलतान बिन अहमद अल जाबेर यांची भेट घेतली आणि त्यांना भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. मोदींनी सुलतान बिन अहमद अल जाबेर यांच्याशी शाश्वत विकास आणि द्विपक्षीय ऊर्जा सहकार्याच्या मार्गांवर चर्चा केली. डॉ. सुलतान अल जबर यांच्याशी झालेली बैठक अतिशय फलदायी होती. आमच्या चर्चेत अधिक शाश्वत मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, असे ट्वीट मोदींनी केले.

 

 

गेल्या वर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएई व्यापारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. कासर येथे पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यात आले. अल-वतन या अध्यक्षीय राजवाड्यात त्यांचे यूएईच्या अध्यक्षांनी प्रेमाने स्वागत केले. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यूएईच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीत संपूर्ण शाकाहारी जेवण दिले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा