29 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरदेश दुनिया“पोप फ्रान्सिस यांना करुणा, आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून लक्षात ठेवलं जाईल”

“पोप फ्रान्सिस यांना करुणा, आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून लक्षात ठेवलं जाईल”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

Google News Follow

Related

पोप फ्रान्सिस यांचे सोमवार, २१ एप्रिल रोजी वॅटिकन सिटीमध्ये निधन झालं. न्युमोनिया झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर रविवारी ईस्टर संडेच्या कार्यक्रमात ते दिसले होते. यानंतर सोमवारी वॅटिकन सिटीमधून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. पोप फ्रान्सिस हे ८८ वर्षांचे होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाल्याच्या भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. या दुःखाच्या वेळी जागतिक कॅथोलिक समुदायाप्रती नरेंद्र मोदींनी सहानुभूती व्यक्त केली आहे. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लाखो लोक करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून नेहमीच लक्षात ठेवतील. लहानपणापासूनच त्यांनी प्रभु ख्रिस्त यांच्या आदर्शांना साकार करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांनी गरीब आणि दलितांची परिश्रमपूर्वक सेवा केली. जे लोक दुःखात होते त्यांच्यासाठी त्यांनी आशेची भावना निर्माण केली, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मी त्यांच्या सोबतच्या माझ्या भेटींना प्रेमाने आठवतो. सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या वचनबद्धतेने प्रेरणा मिळाली आहे. भारतातील लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम नेहमीच जपले जाईल. त्यांना शांती मिळो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा..

पोप फ्रान्सिस यांचे निधन

न्यायाधीशांना जाब विचारणारा इंदिरा गांधींचा जुना व्हीडिओ व्हायरल

१८० अधिकाऱ्यांपैकी ४१ टक्के महिला

अनुराग कश्यपच्या वादग्रस्त वक्तव्यावर पायल घोष भडकल्या

इटलीतील अपुलिया येथे झालेल्या G- 7 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पोप यांनी एकमेकांना मिठी मारली होती. हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. तर, पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी २०२१ मध्ये जी- २० शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर असताना आणि पोप फ्रान्सिस यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली होती. व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी कोविड-१९ च्या महामारीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा