पुतीन भारताच्या पाठीशी; म्हणाले मोदींवर दबाव आणणे मूर्खपणाचे

पुतीन भारताच्या पाठीशी; म्हणाले मोदींवर दबाव आणणे मूर्खपणाचे

 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाला पाठिंबा दर्शविताना त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणणे मूर्खपणाचे आहे. रशियाशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिकेकडून दबाव आणण्याचे प्रयत्न हानिकारक ठरतील आणि शेवटी निष्फळही ठरतील, असेही ते म्हणाले.

गुरुवारी सेंट पिटर्सबर्ग येथे जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले की, रशिया भारताला एक विश्वासार्ह भागीदार मानतो आणि अमेरिकेसह इतर देशांशी भारताचे वाढते सहकार्य हे द्विपक्षीय संबंधांसाठी धोकादायक असल्याचे रशियाला वाटत नाही.

“पंतप्रधान मोदींवर दबाव आणणे निरुपयोगी आहे,” असे पुतिन यांनी म्हटले. त्यांचे हे वक्तव्य भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढविलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे मानले जात आहे.

अमेरिका काही मुद्द्यांवर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, उदाहरणार्थ रशियासोबतच्या काही सहकार्याच्या बाबतीत.मात्र, रशियासोबतच्या सहकार्याबाबत भारताच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी नुकसानकारक ठरतील, असे पुतिन यांनी म्हटले.

“जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी आणि द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक आहे, हे सर्वांनी समजून घेतले आहे.”

पुतिन यांनी अमेरिकेच्या कोणत्याही विशिष्ट कृतीचा उल्लेख केला नाही. तथापि, भारताचे रशियासोबत ऊर्जा, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रांतील सातत्यपूर्ण सहकार्याबाबत पाश्चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या चिंतेकडे त्यांचा रोख असल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेल्या इन्फ्लुएंसरचे टोकाचे पाऊल!

भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ ठरणार!

भारत-अफगाणिस्तान कसोटीचा रणसंग्राम रंगणार!

‘टोरेस’ पुन्हा सक्रिय, परदेशातून हलवली जात आहे सूत्रे

भारत-रशिया संबंधांवर परिणाम नाही

“हा दबाव कुठूनही येत असला तरी त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम आम्हाला दिसत नाहीत,” असे पुतिन म्हणाले. भारत आणि अमेरिकेमधील वाढत्या सामरिक भागीदारीनंतरही भारतासोबतच्या संबंधांच्या भविष्याबाबत रशिया पूर्णपणे आश्वस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आम्ही भारतासोबतचे संबंध विकसित करत आहोत आणि ते पुढेही करत राहू. भारत हा आमच्यासाठी अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे.”

रशियन राष्ट्राध्यक्षांनी भारत-रशिया आर्थिक संबंधांच्या भविष्याबाबतही आशावाद व्यक्त केला. त्यांच्या मते, येत्या काही वर्षांत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.

पुतिन म्हणाले की, भारत हा एक महान देश आणि मोठी लोकशाही आहे, जो सातत्याने स्वतःच्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देऊन निर्णय घेत असतो.

Exit mobile version