30 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरदेश दुनिया'भल्लालदेव' डागुबट्टीच्या उजव्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, किडनीही बसवली

‘भल्लालदेव’ डागुबट्टीच्या उजव्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, किडनीही बसवली

बाहुबली फेम राणा डग्गुबत्तीने किडनी आणि कॉर्नेअल प्रत्यारोपण बद्दल केल्या भावना व्यक्त

Google News Follow

Related

एस.एस.राजामौली दिग्दर्शित बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटांत भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डागुबट्टी सध्या त्याच्या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे.’राणा नायडू’ हि त्याची पहिली वेब सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या प्रमोशनच्या  निमित्ताने राणाने त्याच्या आरोग्यविषयीचा खुलासा या मुलाखती दरम्यान केला आहे.

शारीरिक समस्येमुळे बरेच लोक खचून जातात आणि त्यातून ते बरे झाले तरी त्यांच्यात एक जडपणा असतो, तो तसाच राहतो. माझं कॉर्नियल ट्रान्सप्लांट झाले होते आणि मूत्रपिंडाचेही (किडनी) ट्रान्सप्लांट झाले होते. म्हणून मला असे वाटते कि, मी जवळपास टर्मिनेटर आहे मी आता जिवंत आहे आणि मला फक्त चालत राहायचंय असा विचार मी करायचो.

राणाला उजव्या डोळ्याने दिसत नाही, आंशिक अंधत्वाचा सामना कसा केला याविषयी सुद्धा राणा बोलला.एका मुलाच्या आईचे डोळे गेले होते, त्यामुळे तो खूप दुःखी होता , त्यावेळेस मी त्या मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि माझ्या डोळ्यांविषयी मी त्याला सांगितले  मला माझ्या उजव्या डोळ्यातून दिसत नाही म्हणून आता मी वेगळ्या दृष्टिकोनातून काम करतो हे दाखवून दिले. असेही पुढे राणाने सांगितले   दरम्यान , साऊथचे दोन सुपरस्टार पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये राणा नायडूंच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत.

हे ही वाचा:

रशियन एस ४०० वर भारी होणारे भारताने विकसित केली हवाई संरक्षण यंत्रणा

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

महिलांनो, आजपासून एसटीत निम्म्या तिकीटाने प्रवास करा!

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची नोटीस; काश्मीरमधील महिलांबद्दल केले होते विधान

या सिरीजमध्ये राणा आणि व्यंकटेश हे पिता पुत्रांची भूमिका साकारत असून याची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अमेरिकन वेब सिरीज ‘रे डॉनोवन’ याचा हि वेब सिरीज रिमेक आहे. राणाने २०२० मध्ये मिहिका बजाज सोबत लग्न केले असून त्यांच्या या लग्नसोहळ्याला त्यांचे कुटुंबीय फक्त उपस्थित होते. राणा आणि मिहिका हे त्यांच्या लग्नाआधी बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमांत होऊन त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. राणाने आत्तापर्यंत दम मारो दम , हाऊसफुल्ल ४, बेबी अशा हिंदी चित्रपटात कामे केलेली असून त्याचे वडील हे तेलगू चित्रपटाचे निर्माते आणि वितरक आहे. तर त्याची पत्नी मिहिका हि ‘ड्यु ड्रॉप’ या डिझाईन स्टुडिओची मालकीण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा