32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेत हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

अमेरिकेत हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फटका

Google News Follow

अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील विमान उड्डाणांवर घालण्यात आलेले निर्बंध अखेर हटवण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने (एफएए) शुक्रवारी चार तासांहून अधिक काळ लागू असलेली ही बंदी मागे घेतली. मात्र, विमानसेवेचे वेळापत्रक पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या प्रकारामुळे हजारो प्रवाशांना विमानतळांवर अडकून पडावे लागले.

अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमधील संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्याने उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक सचिव सीन डफी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी रडार आणि दळणवळण यंत्रणेत अनियमितता आढळली. हवाई वाहतूक नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या स्विचेस आणि राऊटर्सवर मोठ्या प्रमाणात डेटा आल्याने विसंगत माहिती मिळू लागली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणे रोखण्यात आली.

रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी अमेरिकेची हवाई हद्द पुन्हा उड्डाणांसाठी खुली करण्यात आली. या बिघाडामुळे सुमारे ६ हजार ६०० उड्डाणे रद्द झाली, तर ८ हजार ६०० उड्डाणांना विलंब झाला. रविवारी होणारी आणखी सुमारे १ हजार ५०० उड्डाणेही रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, हा सायबर हल्ला किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीतील बिघाड असल्याचा ठोस पुरावा नसल्याचे होमलँड सिक्युरिटी मंत्री मार्कवेन मुलिन यांनी स्पष्ट केले. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडाचे संकेत मिळाले असले, तरी चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) आणि होमलँड सिक्युरिटी विभागही तपासात सहभागी आहेत.

हे ही वाचा:

डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना ओ.एन.ई. इंडिया पुरस्कार

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

अमेरिकेची हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा जुनी असल्याने तिच्या आधुनिकीकरणाची गरज डफी यांनी अधोरेखित केली. यासाठी त्यांनी ५० अब्ज डॉलरच्या निधीची मागणी केली आहे. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशव्यापी स्तरावर सर्व विमान उड्डाणे थांबवण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जानेवारी २०२३ मध्येही तांत्रिक बिघाडामुळे देशांतर्गत उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा