परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर लवकरच रशिया दौरा करणार आहेत. “२१ ऑगस्ट रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची मॉस्को येथे चर्चा होणार आहे. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहकार्याच्या प्रमुख बाबींवर चर्चा होईल,” असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीटद्वारे म्हटले आहे.







