34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरदेश दुनियाआयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी

आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी

सचिन तेंडुलकरचा ५०वा वाढदिवस

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १० खास गोष्टी नमूद केल्या. त्याने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य विक्रम केले पण त्यातील काही विक्रम नसले तरी त्याच्या त्या खेळी खूप महत्त्वाच्याही होत्या. वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अशा काही खेळींची आणि काही क्षणांची आठवण आयसीसीने करून दिली आहे.

त्या अशा

२०११चा वर्ल्डकप

सचिन तेंडुलकरच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत सचिनने अनेक वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला खरा पण त्याला विजेतेपदाचे सुख काही अनुभवता आले नव्हते. २०११चा वर्ल्डकप मात्र वेगळा ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्ध त्या अंतिम सामन्यात सचिनने केवळ १८ धावा केल्या पण त्याने त्या स्पर्धेत ४८२ धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये दुसरे स्थान मिळविले होते. मात्र तो वर्ल्डकप भारताने जिंकला आणि खांद्यावर बसलेला सचिन, हातात तिरंगा हे कायम हृदयात कोरला गेलेला क्षण जगभरातील चाहत्यांना अनुभवता आला.

 

२०११च्या वर्ल्डकपमधील पाकविरुद्धची खेळी

सचिनने २०११च्या वर्ल्डकपमध्ये ११५ चेंडूंत ८५ धावांची पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी अविस्मरणीय ठरली. भारताने उपांत्य फेरीचा तो सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

 

इंग्लंडविरुद्ध १२० धावा

२०११च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने १२० धावांची झंझावाती खेळी केली होती. ते त्याचे वनडेमधील ४७वे शतक होते. त्यात त्याने पाच खणखणीत षटकारही लगावले. भारताने ३३८ धावांचा डोंगर रचला.

 

२००३च्या वर्ल्डकपमधील दमदार खेळी

पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर २७४ धावांचे लक्ष्य कठीण वाटत होते. पण सचिनने ९८ धावांची जबरदस्त खेळी करत सेंच्युरियनच्या मैदानातील लोकांना खुश केले. शोएब अख्तरचा ताशी १५० किमीचा माराही सचिनला रोखू शकला नाही.

 

स्टेडियमबाहेर फेकलेला चेंडू

 

२००३च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली आणि भारताला आणखी एक विजय मिळवून दिला पण अँडी कॅडिकच्या गोलंदाजीवर त्याने मिडविकेटला जो षटकार लगावला तो मैदानाच्या बाहेर गेला. चक्क कार पार्किंगच्या भागात चेंडू जाऊन पडला.

वडिलांच्या निधनाचे दुःख

१९९९चा वर्ल्डकप सचिनसाठी दुःखद होता. वडील रमेश तेंडुलकर यांच्या निधनामुळे सचिन झिम्बाब्वेचा सामना सोडून भारतात परतला होता. पण केनियाविरुद्धच्या सामन्यात तो परतला. १४० धावांची झंझावाती खेळी त्याने केली आणि या स्पर्धेत डळमळीत कामगिरी करणाऱ्या भारताला सावरले. द्रविडसह त्याने २३७ धावांची भागीदारीही केली होती.

 

सचिनच्या १४१ धावा आणि ४ बळीही

१९९८च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४१ धावांची खेळी केली. ढाक्यातील या सामन्यात सचिनच्या या खेळीमुळे भारताने ८ बाद ३०७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानेही जवळपास हे लक्ष्य गाठलेच होते मात्र सचिनच्या गोलंदाजीची कमाल पाहायला मिळाली आणि ३८ धावांत ४ बळी घेत त्याने कांगारुंच्या पिशवीतून विजय काढून घेतला.

हे ही वाचा:

चीनच्या समुद्रात बुडालेल्या जपानी जहाजाचा ८१ वर्षानंतर लागला शोध !

वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!

सावरकर नावाची लस खूप लहानपणी टोचली गेली, म्हणून जिवंत आहोत!

गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

 

९० धावांची खेळी

१९९६च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सचिनने ९० धावांची खेळी केली होती. त्यामुळे २ बाद ७ अशा बिकट अवस्थेतून सचिनने भारताला ३ बाद १४३ अशी स्थिती गाठून दिली. शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा यांची धुलाई त्याने केली.

 

पाकविरुद्ध नाबाद ५४ अविस्मरणीय

या वर्ल्डकपमध्ये सचिन प्रथमच पाकविरुद्ध खेळत होता. स्पर्धेत तो पुढे सर्वोत्तमही ठऱला. सचिनने ५४ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताने पाकला ४३ धावांनी पराभूत केले.

८४ धावांची खेळी

१९९२च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने न्यूझीलंडविरुद्ध ८४ धावांची संयमी खेळी केली होती. अजय जडेजा सलामीला आला आणि दुखापतग्रस्त होऊन परतला. पण सचिनने भारताला २३० धावसंख्या गाठून दिली ती त्याच्या ८४ धावांमुळे. पण दुर्दैवाने न्यूझीलंडने सामना जिंकला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा