32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेषचीनच्या समुद्रात बुडालेल्या जपानी जहाजाचा ८१ वर्षानंतर लागला शोध !

चीनच्या समुद्रात बुडालेल्या जपानी जहाजाचा ८१ वर्षानंतर लागला शोध !

१ जुलै १९४२ रोजी फिलिपाईन्सनजीकच्या समुद्रात बुडाले होते.जहाजात युद्धकैदी होते याची कल्पना हल्ला करणाऱ्या अमेरिकी पाणबुडीला नव्हती .

Google News Follow

Related

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने या युद्धाची १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरुवात झाली. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले.अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली.

मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. १९४२ मध्ये अमेरिकन पाणबुडीच्या हल्ल्यात जपानचे एक मोठे जहाज समुद्रात बुडाले होते.त्याच जहाजाच्या अवशेषांचा आता तब्बल ८१ वर्षानंतर शोध लागला आहे.”एसएस मॉन्टेविडिओ मारू” असे या शोध घेतलेल्या जहाजाचे नाव असून या जहाजात जपानी सैनिकांसह अन्य लोक मिळून १०६० युद्धकैदी मरण पावले होते.”दुसरे महायुद्ध” संपल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संशोधक त्यांच्या मृत लोकांचा शोध घेत होते. ‘सायलेंटवर्ल्ड फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते गेल्या १२ दिवसांपासून या जहाजाचा शोध घेत होते.

हे ही वाचा:

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा पोलिसांच्या जाळ्यात

NASA : २१ वर्षांपूर्वी आकाशात झेपावलेला स्पेसक्राफ्ट कोसळले; अनर्थ टळला !

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

एक लाख पुस्तकांच्या सड्याने डोंबिवलीचा फडके रोड बहरला

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.फिलिपाईन्स देशाच्या लूझॉन बेटाजवळ १३ हजार फूट खोल पाण्यात सापडले आहे.एसएस मॉन्टेविडिओ मारू जहाज युद्धामध्ये पकडलेले ऑस्ट्रेलियाचे ८५० सैनिक व जपानी सैनिकांसह सुमारे १०६० कैदी होते हे जहाज पापुआ न्यू गिनीहून बंदिवान सैनिकांना चीनकडे घेऊन जात होते. १९४२ च्या अमेरिकन पाणबुडीने ४ टॉर्पेडोने केलेल्या हल्ल्यात एसएस मॉन्टेविडिओ मारू जहाज काही मिनिटांतच समुद्रात विसर्जित होऊन जहाजात असणाऱ्या सर्व लोकांचा बुडून मृत्यू झाला.ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी फिलिपाइन्सजवळ बुडालेल्या एसएस मॉन्टेविडियो मारू या जपानी वाहतूक जहाजाच्या अवशेषाचा शोध लागल्यावर ट्विट केले.

या जहाजावर उपस्थित असलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून मृतांची माहिती देण्यात आली नव्हती. जहाज बुडाल्यानंतर अवशेष कुठे गेले? हा प्रश्नही गूढ बनला होता.अँथनी अल्बानीज म्हणाले- मला आशा आहे की या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आता थोडा दिलासा मिळाला असेल.अँथनी अल्बानीज म्हणाले,जहाजाचे अवशेष मिळाल्यानंतर त्यांनी आता यात कोणतीही छेडछाड केली जाणार नसल्याचे सांगितले आहे. खराब झालेल्या जहाजातील मानवी अवशेषही काढले जाणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

युद्धाच्या ८१ वर्षांनंतर या जहाजाचे अवशेष शोधणे ही मोठी गोष्ट आहे, कारण हे जहाज टायटॅनिकपेक्षा जास्त खोलीत सापडले आहे, त्यामुळे या जहाजाचे अवशेष संशोधनासाठी ठेवण्यात येणार आहेत.’सायलेंटवर्ल्ड फाउंडेशन’ या स्वयंसेवी संशोधकांनी सांगितले की,एसएस मॉन्टेविडिओ मारू जहाजाचा शोध लागल्याचा आम्हाला आनंद आहे पण या दुःखद घटनेची आठवण येऊन आमच्या डोळ्यात अश्रू तरळले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा