केरळची मेट्रोची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान केरळला मेट्रोची भेट देणार आहेत. ही मेट्रो रुळावर नाही तर पाण्यावर धावणार असल्याने ती वॉटर मेट्रो असेल. बऱ्याच कालावधीनंतर या मेट्रोला हिरवा मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये २३ वॉटर बोटी आणि १४ टर्मिनल आहेत. त्यापैकी चार टर्मिनल पूर्णत: सुरू झाले आहेत. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये प्रथमच वॉटर मेट्रो चालवली जात आहे.
रविवारी या बाबतची अधिकृतपणे माहिती देण्यात आली. ही सेवा सुरू झाल्याने शहरातील नागरिकांच्या वाहतुकीत सुसूत्रता येणार आहे. कोचीसारख्या शहरात वॉटर मेट्रो खूप उपयुक्त आहे. या कमी खर्चिक वॉटर मेट्रोमुळे प्रवास सुलभ होणार आहे. कोची आणि त्याच्या आसपासच्या १० बेटांना जोडणारा हा केरळचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मेट्रो प्रकल्प कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केलेल्या आठ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींनी मेट्रोला प्रारंभ करण्यात येईल असे वॉटर मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोची हा केरळमधील सर्वात दाट लोकसंख्येचा जिल्हा आहे आणि अशा प्रकारे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कोची सरोवराच्या किनाऱ्यावर सहज प्रवेश देण्यासाठी वाहतुकीची ही नवीन संकल्पना समोर आली. या प्रकल्पासाठी १,१३६. ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
वॉटर मेट्रो प्रकल्प ७८ किलोमीटरमध्ये पसरलेला असून तो १५ मार्गांवरून जाणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ‘कोची वॉटर मेट्रो’ हा राज्याचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे कोची बंदर शहराच्या विकासाला आणि वाढीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिल रोजी येथे एका कार्यक्रमात कोची वॉटर मेट्रो सेवेचा शुभारंभ करतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा:
सत्यपाल मलिक यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात
प्रवासी कोची १ कार्ड वापरून प्रवासी कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करू शकतात. त्याच प्रमाणे कोणीही डिजिटल पद्धतीने तिकीट बुक करू शकतो. सिंगल ट्रिप तिकिटांव्यतिरिक्त, प्रवासी वॉटर मेट्रोमध्ये साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक पास देखील घेऊ शकतात. सुरुवातीला, प्रत्येक १५ मिनिटांनी वॉटर मेट्रो असेल कोची वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे एक लाखाहून अधिक बेटांना फायदा होणार आहे. हा प्रकल्प व्यावसायिक मालमत्ता विकास आणि पर्यटन आधारित उपक्रमांद्वारे जीवनमान सुधारेल.