34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाअखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात

अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात

सध्या वेशात आलेल्या पोलिसांनी गुरुद्वारात केली धरपकड

Google News Follow

Related

पंजाब पोलिसांना ३६ दिवसांनी वारस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक केली आहे.अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता.याआधी अमृतपाल सिंहने रात्री उशिरा मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे बोलले जात होते, मात्र काही वेळाने अमृतपालला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल आता पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पंजाबचे कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्पित शुक्ला यांनी सांगितले.

जसबीर सिंग रोडाई यांच्या म्हणण्यानुसार, अमृतपाल काल रोडे गावात पोहोचला जिथे सकाळी ७ वाजता गावातील गुरुद्वारामध्ये प्रार्थना केल्यानंतर त्याने तिथेही उपदेश केला आणि त्यानंतर जसबीर सिंग रोडाई यांनी पोलिसांना अमृतपालबद्दल सांगितले त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर अमृतपालला आता रस्त्याने अमृतसरला नेण्यात येत असून तेथून तो थेट विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात जाणार आहे. त्याचा साथीदार पापलप्रीत सिंग याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पापलप्रीतसोबत अमृतपाल सिंग लुधियाना, हरियाणा, दिल्ली आणि ईत्तर प्रदेशात लपून बसला होता . अमृतपालवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपालला समर्थकांसह आत्मसमर्पण करायचे होते. त्यासाठी तो शनिवारी रात्री मोगाच्या रोडे गावात आला होता. रोडे गावात आल्यानंतर त्याच्या जवळच्या मित्रांनी पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आत्मसमर्पणासाठी त्याने रविवार म्हणजेच आजचा दिवस निवडला होता. सरेंडर करण्याच्या वेळी अमृतपालला आपली ताकद दाखवायची असे सांगण्यात येत आहे. जमाव जमल्याने वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन अमृतसरचे सहाय्य्क पोलीस महासंचालक सतिंदर सिंह आणि पंजाब पोलिस इंटेलिजन्सचे आयजी रविवारी सकाळीच रोडे गावातील गुरुद्वारात पोहोचले. सध्या गणवेशात आलेल्या पोलिसांनी सकाळीच अमृतपालची धरपकड केली.

अमृतपाल सिंग १८ मार्चपासून फरार होता आणि जवळपास एक महिन्यापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळत होती.आपल्या एका समर्थकाच्या सुटकेसाठी अमृतपालने २३ फेब्रुवारीला पंजाबमधील अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. पंजाब पोलिसांनी त्यानंतर अमृतपाल सिंग आणि त्याच्या संघटनेच्या ‘वारीस पंजाब दे’ विरोधात मोठी कारवाई सुरू केली होती, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला आणि आता तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

हे ही वाचा:

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले

अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

अमृतपाल आणि त्यांच्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेच्या सदस्यांविरुद्ध कारवाई १८ मार्चपासून सुरू झाल्यानंतर तो दोनदा पोलिसांच्या तावडीतून सुटला होता.  प्रथम १८ मार्च रोजी जालंधर जिल्ह्यात वाहने बदलून आणि नंतर २८ मार्च रोजी होशियारपूरमध्ये त्याचा प्रमुख सहकारी पापलप्रीत सिंगसह पंजाबला परतला त्यावेळी असा प्रकारे त्याने दोनदा पोलिसामना चकवा दिला होता. अमृतपालची एनआरआय पत्नी किरणदीप कौर यांना २० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखले होते. ती लंडनला जाणार होती. श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर किरणदीपची तीन तास चौकशीकेल्यानंतर सुटका करण्यात आली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा