30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरदेश दुनिया'सावरकर गौरव यात्रेला' जळगावातून सुरुवात

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात

सावरकर गौरव यात्रेचे टीझर रिलिज

Google News Follow

Related

भाजप पक्षा तर्फे राज्यभरात ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ यांनी भारत मातेसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ३० मार्च ते सहा एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. आज भारतीय जनता पक्षाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बळीराम पेठेतील वसंत स्मृती कार्यालयातून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा टीझर पण आज प्रसिद्ध करण्यात आला. या सावरकर गौरव यात्रेनिमित्त आज रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन या वेळेस करण्यात आले .

या गौरव यात्रेच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आपल्या देशासाठीचे अनमोल कार्य पुढच्या पिढीला कळावे यासाठी या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी यांनी आणि शिवाय इतरही काँग्रेस नेत्यांनी वारंवार अपमान केला आहे. हि गौरव यात्रा भाजपाकडून सहा एप्रिल पर्यंत संपूर्ण जळगाव मध्ये एकूण नऊ ठिकाणांना भेट देणार आहे. या गौरव यात्रेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाप्रतीचे बलिदान त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटून केलेल्या कामाचा माहितीपट यातून मिळणार आहे. या यात्रेचा समारोप भाजपाच्या स्थापना दिनी होणार आहे.

हे ही वाचा:

एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी

या यात्रेच्या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, इत्यादींसह अनेक सावरकरप्रेमी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहरातील भोसरी आणि पिंपरी-चिंचवड या मतदारसंघामध्ये दोन एप्रिल २०२३ ला सावरकर गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी सांगितले कि, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानावरून आम्ही सारे सावरकर हि मोहीम राबवली जाते आहे. राज्यातील सर्व मंत्री आणि नेत्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रो फाईलमध्ये या यात्रेचे चित्र ठेवले आहे. राहुल गांधी सातत्याने सतत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहे. त्यामुळे राज्यातल्या जनते मध्ये राग आणि असंतोष पसरला आहे. याच असंतोषाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात , तालुक्यात विधानसभा मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती पोचवली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा