33 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरदेश दुनियाबेंगळुरूत एसयूव्हीने दुचाकीस्वाराला उडवत ट्रकला दिली धडक

बेंगळुरूत एसयूव्हीने दुचाकीस्वाराला उडवत ट्रकला दिली धडक

सहा विद्यार्थी आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

Google News Follow

Related

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू जवळील होसकोट परिसरात पहाटे भीषण अपघात झाला. अतिवेगाने धावणाऱ्या एसयूव्ही गाडीने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत सहा विद्यार्थी आणि एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास सॅटेलाइट टाउन रिंग रोडवर घडली. एसयूव्हीमध्ये सहा तरुण विद्यार्थी होते. ते जॉयराईडसाठी बाहेर पडले होते. गाडीचा वेग सुमारे १५० ते १६० किमी प्रतितास असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने आधी पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली.
हे ही वाचा:
अभिनेता धनुषकडून ‘या’ कारणासाठी २० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

चित्रपट तिकिटांबद्दल प्रश्न विचारणाऱ्या जया बच्चनना अर्थमंत्री सीतारमण यांनी सुनावले

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

डोनाल्ड ट्रंपचा इराणला पुन्हा इशारा

या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तो रात्रीची ड्युटी संपवून घरी परतत होता. त्यानंतर एसयूव्हीने पुढे जाऊन एका कँटर ट्रकला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. ट्रकचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही वेळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.

एसयूव्हीतील सर्व सहा विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ ते १८ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. ते सर्व विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपासाद्वारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात अतिवेग हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा