27 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेच्या तिजोरीला टाळे! शटडाऊन म्हणजे काय?

अमेरिकेच्या तिजोरीला टाळे! शटडाऊन म्हणजे काय?

वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये तात्पुरते निधी विधेयक मंजूर करण्यात अपयश

Google News Follow

Related

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट ओढावलं असून २०१९ नंतरचा हा पहिलाच सरकारी बंद आहे. यामुळे फेडरल सरकार ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ट्रम्प सरकारला संसदेत निधीला मंजुरी न मिळाल्यानं टाळं लावण्याची वेळ आली आहे. सहा वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका पुन्हा एकदा बंद पडली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये तात्पुरते निधी विधेयक मंजूर करण्यात अपयश आले. यासाठी त्यांना ६० मतांची आवश्यकता होती, परंतु सरकारला फक्त ५५ मते मिळाली. विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरल्यानंतर, ट्रम्प सरकारला सात आठवड्यांची मुदतवाढ देण्यासाठी तात्पुरत्या निधी विधेयक सादर करण्यात आले. या निधीची अंतिम मुदत आज रात्री संपली. म्हणजेच आता सरकार कोणतेही पैसे खर्च करू शकणार नाही. याचा अर्थ सर्व सरकारी कामकाज ठप्प होणार आहे.

यापूर्वी, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प प्रशासनाला अल्पकालीन उपाययोजना म्हणून २१ नोव्हेंबरपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सिनेटमध्ये तात्पुरते निधी विधेयक सादर केले होते. मात्र, सिनेटमध्ये रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. सिनेटमध्ये सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅट्समध्ये जोरदार वादविवाद झाला. १०० सदस्यांच्या सभागृहात या प्रस्तावाला ६० मते मिळाली नाहीत आणि हा प्रस्ताव ५५- ४५ च्या फरकाने फेटाळण्यात आला. यानंतर, व्हाईट हाऊसच्या वेबसाइटवर शटडाऊन काउंटडाउन घड्याळ बसवण्यात आले. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटने मंगळवारी मध्यरात्री सरकार बंद पडेल याची पुष्टी करणारा एक मेमो देखील जारी केला. या मेमोवर संचालक रसेल वॉट यांनी स्वाक्षरी केली आहे.

हे ही वाचा:

आरबीआयचा रेपो दर जैसे थे स्थितीत

भारतावरील निर्बंधांनंतर ट्रम्प यांचा परराष्ट्र धोरणाबद्दलचा सदोष दृष्टिकोन दिसतो!

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी महोत्सव आयोजकासह गर्ग यांच्या व्यवस्थापकाला अटक

फिलीपिन्समध्ये ६.९ रिश्टर स्केलचा भूकंप; ३१ जणांचा मृत्यू

शटडाऊन म्हणजे काय?

अमेरिकन सरकार चालवण्यासाठी, संसदेने दरवर्षी बजेट किंवा निधी विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही कारणास्तव, हे विधेयक अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले नाही, तर सरकारी कार्यालये काम करणे बंद करतात, कारण कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळू शकत नाहीत. शिवाय, इतर खर्च देखील थांबतात, ज्यामुळे काम थांबते. या परिस्थितीला शटडाऊन म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन दशकांत अमेरिकेतील हे पाचवे मोठे शटडाऊन आहे. असे मानले जाते. या शटडाऊनचे व्यापक परिणाम होऊ शकतात, कारण अनेक प्रमुख कार्यालये बंद होतील. दरम्यान, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन एकमेकांना शटडाऊनसाठी दोष देत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा