33 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरदेश दुनियास्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि स्पेन पहिल्यांदाच आमनेसामने आले

Google News Follow

Related

कर्णधार ओल्गा कार्मोनाच्या नेतृत्वाखाली स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने रविवारी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला १-०ने पराभूत करून स्पेनला पहिलेवहिले विश्वविजेतेपद मिळवून दिले. कर्णधार ओल्गा कार्मोनाने अंतिम फेरीत स्पेनला इंग्लंडवर १-० अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली. कार्मोनाने २९व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यातील एकमेव ठरला.

 

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आले होते. प्रशिक्षक सेरिना वेमन यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर इंग्लंडने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. इंग्लंडने ३५ सामने जिंकले होते आणि चार अनिर्णित राहिले होते. अंतिम फेरीत मात्र इंग्लंडला पराभूत करून केवळ स्पेनने त्यांच्या केवळ तिसर्‍याच विश्वचषकात पहिले मोठे विजेतेपद पटकावले. स्पेनचे प्रशिक्षक विल्डा यांच्या नावावरही एका वेगळ्या कामगिरीची नोंद झाली. सन २०००पैसून महिलांच्या महत्त्वाच्या स्पर्धा म्हणजे विश्वचषक, ऑलिम्पिक्स आणि द युरोस स्पर्धा जिंकून देणारे दुसरे पुरुष प्रशिक्षक म्हणून त्यांनी नोंद झाली आहे.

 

हे ही वाचा:

गंगोत्री महामार्गावर भाविकांची बस दरीत कोसळून अपघात, सहा भाविकांचा मृत्यू

देशभरातील जमीन व्यवहारांत मुंबई अव्वल

भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी चक्क ‘यूपीआय’द्वारे केली भाजीखरेदी

चीनवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसने आधी हिंदी चिनी भाई भाईचे उत्तर द्यावे !

१६व्या मिनिटाला इंग्लंडला गोलची सर्वोत्तम संधी मिळाली होती. परंतु त्यावेळी आघाडीपटू लॉरेन हेम्पने मारलेला फटका क्रॉसबारला लागला. तर, उपांत्य सामन्यात स्वीडनविरुद्ध गोल करणाऱ्या कार्मोनाने अंतिम लढतीतही निर्णायक भूमिका बजावली. सलमा पारालुएलोलाही गोलची संधी होती. मात्र उत्तरार्धानंतर तिने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. ६८व्या मिनिटाला इंग्लंडच्या केरा वॉल्शच्या हाताला चेंडू लागल्यने स्पेनला पेनल्टी देण्यात आली. मात्र स्पेनच्या जेनिफर हार्मोसोने मारलेला फटका इंग्लंडची गोलरक्षक मेरी इअरप्सने अडवला. त्यामुळे स्पेनची आघाडी वाढली नाही. अखेर स्पेनने एका गोलची आघाडी अखेरपर्यंत राखत सामना जिंकला.

स्पेन हा पाचवा संघ

महिला विश्वचषक जिंकणारा स्पेन हा पाचवा संघ ठरला आहे. यापूर्वी अमेरिका (चारवेळा), जर्मनी (दोनवेळा), नॉर्वे (एकदा) आणि जपान (एकदा) विश्वविजेते ठरले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा