35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरदेश दुनियाकधी होणार आहेत, उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा?

कधी होणार आहेत, उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा?

Google News Follow

Related

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. मात्र अद्याप या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. या परीक्षा देऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. परीक्षा उशिरा झाल्या तर शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सीईटी कक्षाकडून दरवर्षी या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

फार्मसी, कृषी, इंजिनिअरिंग, लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या कक्षाकडून प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. मात्र यंदा ही परीक्षा कधी होणार आहे याचीच कल्पना अद्याप विद्यार्थ्यांना दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी पूर्ण केली असून त्याचे शुल्कही भरले आहे. १५ विविध सीईटीसाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून तब्बल ७ लाख ७४ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. हे सर्वच विद्यार्थी आता परीक्षेच्या तारखांच्या प्रतीक्षेत आहेत.

हे ही वाचा:

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल

एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

प्रवेश परीक्षा कक्षामार्फत परीक्षा घेणारी कंपनी बदलण्याची मोहीम गेल्या वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळेच उशीर होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रखडलेल्या परीक्षांमुळे पुढील शैक्षणिक सत्र कोलमडणार, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रवेश परीक्षांबाबत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

एमएचटी सीईटी- ४२४७७३, एमबीए/एमएमएस- १३२१९०, एमसीए- २५२०८, विधी ५ वर्ष- २५९७१, विधी ३ वर्ष- ६८८७२, बीएबीएड, बीएस्सीबीएड– ३९४७, एमएड- २७८०, बीपीएड- ६८८८, एमपीएड- २०३९, बीएड, एमएड- १५०७, बीएड जनरल स्पेशल- ७५७१७, बीएचएमसीटी- १४६०, एमएचएमसीटी- ५०, एमआर्च- १०९५, फाईन आर्ट- ३३६२ याप्रमाणे सीईटी परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा