25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरदेश दुनियापाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला, तीन जवान ठार

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला, तीन जवान ठार

युद्धजन्य परिस्थितीत असल्याचा पाकिस्तानचा दावा

Google News Follow

Related

पाकिस्तान आज सकाळी-सकाळी झालेल्या जोरदार स्फोटांनी हादरून गेला. खैबर पख्तूनख्वाच्या राजधानी पेशावरमध्ये निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला झाला आहे. पाकिस्तानी मीडिया ‘डॉन’ने याची पुष्टी केली आहे. धमाक्यानंतर परिसरात गोळीबारही झाला.

डॉनच्या अहवालानुसार हल्ला सकाळी ८ वाजता सद्दार-कोहाट रोडवर झाला. हल्लेखोरांनी सर्वप्रथम निमलष्करी दलाच्या मुख्यालयाच्या गेटवर आत्मघाती स्फोट केला. या स्फोटानंतर त्यांनी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांना ठार केले. या हल्ल्यात तीन जवान ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत.

डॉनने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेबुलरी मुख्यालयावर हल्ला झाला आहे. पेशावर कॅपिटल सिटीचे पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद म्हणाले, “एफसी मुख्यालयावर हल्ला झाला आहे. आम्ही प्रत्युत्तर देत आहोत आणि परिसराला घेराव घातला आहे.”

सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने एफसी मुख्यालयाच्या गेटवर स्वतःला उडवून दिले. ब्लास्टनंतर गोळीबाराचा आवाजाही ऐकू आला.

नागरी पॅरामिलिटरी फोर्सचे नाव सरकारने जुलै महिन्यात बदलून ‘फ्रंटियर कॉन्स्टेबुलरी’ केले होते. या फोर्सचे मुख्यालय एका गजबजलेल्या भागात, लष्करी छावणीजवळ आहे. डॉनच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये, विशेषतः केपी आणि बलूचिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्येच इस्लामाबादमध्ये कोर्टच्या बाहेर एक आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यात १२ लोक ठार आणि किमान २७  जखमी झाले होते. इस्लामाबादच्या जी-११ भागातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर हा हल्ला झाला होता.

हे ही वाचा:

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

कढीपत्ता : आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी वरदान

‘निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!’

गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी कोर्टबाहेर सांगितले की दुपारी १२.३९ वाजता “आत्मघाती स्फोट” झाला. यात १२ लोक ठार झाले आणि २७ जखमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींच्यावर उपचार सुरू असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला आहे.

यापूर्वीच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही ही घटना ‘आत्मघाती हल्ला’ असल्याचे म्हटले होते. संरक्षण मंत्री आसिफ यांनी या हल्ल्याला “वेक-अप कॉल” म्हटले. “आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत. काही लोकांना वाटत असेल की पाकिस्तानी सेना हे युद्ध फक्त अफगाण-पाक सीमा भागात किंवा बलूचिस्तानच्या दुर्गम भागांत लढत आहे, पण आज इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयात झालेला आत्मघाती हल्ला हा एक गंभीर इशारा आहे,” असे ते म्हणाले.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू जिल्ह्यातील एपीसी मुख्यालयावरही हल्ला झाला होता. त्या कारवाईत सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते आणि पाच दहशतवादी मारले गेले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा