35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानमध्ये 'लोकशाही'ची गळचेपी; पत्रकाराला नाक घासायला लावले

अफगाणिस्तानमध्ये ‘लोकशाही’ची गळचेपी; पत्रकाराला नाक घासायला लावले

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यापासून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यात असंतोषही वाढत चालला आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. मात्र आंदोलने केली जात असताना त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तालिबानकडून वाईट वागणूक दिली जात आहे.

तालिबान्यांनी आपले ओळखपत्र आणि कॅमेरा हिसकावून घेतला. त्यांनी लाथा घातल्या, असे मंगळवारी सुरू असलेल्या महिला आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने सांगितले. तालिबानने एका अफगाण पत्रकाराला पकडले. तत्पूर्वी त्याला जमिनीवर नाक घासण्याची शिक्षा दिली. तसेच आंदोलनाचे वार्तांकन केले म्हणून माफीही मागायला लावली. अफगाणिस्तानात पत्रकारांना काम करणे आता कठीण झाले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

‘टोलो’ चॅनलच्या एका कॅमेरामनला अटक केल्याचे ‘टोलो’ वाहिनीकडून सांगण्यात आले. वाहिद अहमदी असे अटक केलेल्या कॅमेरामनचे नाव आहे. ‘टोलो’ चॅनलच्या एका पत्रकाराला काही दिवसांपूर्वी काबूलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली होती. तसेच पत्रकाराजवळील कॅमेरा, वैयक्तिक मोबाईल आणि इतर साहित्य तालिबान्यांनी जप्त केले होते.

जर्मनीचे चॅनल ‘डॉईच वेली’ यांनी सांगितले की, तालिबानचे दहशतवादी घराघरात जाऊन पत्रकारांना शोधत आहेत. ते केवळ पत्रकारांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करत नाहीत तर त्यांच्या कुटुंबियांचा देखील बळी घेत आहेत. अनेक पत्रकारांना तालिबानने मारहाण देखील केली आहे. तरीही आम्हाला दहशतवादी म्हणू नका, असा तालिबानचा आग्रह आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा