पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला आहे की अफगाण तालिबानने त्यांच्या देशावर केलेल्या हल्ल्यांमागे भारताचा हात आहे. पाकिस्तानवर हल्ला करण्याचे निर्णय काबूलपेक्षा नवी दिल्लीत घेतले जात आहेत असे आसिफ म्हणतात. अफगाण-पाकिस्तान सीमेवर अलिकडेच झालेल्या संघर्षांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आसिफ म्हणाले की, अफगाण सध्या भारतासाठी प्रॉक्सी युद्ध लढत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराबद्दल तालिबानच्या हेतूंबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर भयंकर चकमकी झाल्या आहेत. तालिबानने ५८ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू आणि अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या तालिबानी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ भारताला लक्ष करत आहेत. आसिफ म्हणतात की या तणावामागे दिल्लीचा हात आहे.
मुत्ताकींच्या भारत भेटीबद्दल प्रश्न
ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीचा संबंध अफगाण-पाकिस्तान सीमेवरील संघर्षाशी जोडला आहे. आसिफ म्हणाले, “अमिर मुत्ताकी यांच्या भारत भेटीदरम्यान पाकिस्तानविरोधी कट रचण्यात आले होते. अधिकृतपणे, मुत्ताकी यांच्या भेटीचा केंद्रबिंदू व्यापार आणि द्विपक्षीय संबंध होते, परंतु पडद्यामागे त्याचे वेगळेच उद्दिष्ट होते.”
हे ही वाचा :
आयपीएस वाय पूरन कुमार यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल
“पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलेय, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही”
पाकिस्तानी सैन्याचे टँकच नाही तर तालिबानने सैनिकांच्या पँटही काढून घेतल्या
२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी अहमदाबादचा विचार होणार
दरम्यान, कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. तथापि, लढाई थांबल्यानंतरही तणाव कायम आहे. पाकिस्तानचा दावा आहे की टीटीपीसारखे गट अफगाणिस्तानात आश्रय घेत आहेत आणि त्यांच्या भूमीवर हल्ले करत आहेत. मात्र, तालिबानने हे आरोप फेटाळून लावले आहेत.







