33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरदेश दुनियाजी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग

जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग

प्रतिनिधींकडून श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन

Google News Follow

Related

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात जय्यत तयारी केली जाते. यंदा भारताकडे जी-२० परिषदेचे अध्यक्ष पद असून देशभरात यासंबंधीच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी नुकतच पालखी सोहळ्याला हजेरी लावत वारकरी संप्रदायाची परंपरा अनुभवली. तसेच या प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शनही घेतले.

संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींना पालखी सोहळा अनुभवता प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्या वतीने मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रतिनिधींचे स्वागत केले.

ढोल ताशाच्या गजरात तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. या वेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वांनी मोबाईलमध्ये वारीची छायाचित्रे काढली. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार केला. ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधींनी नृत्याचाही आनंद घेतला. तर फुगडीचाही फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. याची क्षणचित्रे मोबाईलमध्ये कैद करण्यात आली.

पुण्यात पालखी रस्त्यावरून हातात भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, टाळ वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात दिंड्यांचे आगमन होताच जी – २० चे प्रतिनिधी वातावरणात दंग झाले होते.

हे ही वाचा:

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार

दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी

सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’

या वेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा