31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
घरदेश दुनियापश्चिम आशियाई देश- अमेरिकेदरम्यान युद्धाचे सावट

पश्चिम आशियाई देश- अमेरिकेदरम्यान युद्धाचे सावट

Google News Follow

Related

गाझा पट्टीत इस्रायलच्या सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद पश्चिम आशियाला व्यापून टाकणाऱ्या संघर्षाद उमटवण्याचे काही घटकांचे प्रयत्न असल्याचा दावा अमेरिकी, इस्रायली आणि लेबनीज अधिकारी करत असतानाच मंगळवारी लेबनॉनमध्ये हमासच्या एका सर्वोच्च नेत्याची झालेली हत्या आणि बुधवारी इराणमध्ये झालेल्या दुहेरी स्फोटात असंख्य जणांचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर पश्चिम आशिया आणि अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत.

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने पश्चिम आशियाई देशांत या संघर्षाची पडसाद उमटू नयेत, असा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न आता अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

इराणमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही तासांनंतरच अमेरिका आणि त्याच्या १२ सहकारी देशांनी या प्रदेशातील ‘हौथीज ऑफ येमेन’ या दहशतवादी संघटनेला लेखी इशारा दिला आहे. ही दहशतवादी संघटना दररोज क्षेपणास्त्र, ड्रोनच्या साह्याने व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत आहेत. येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात सध्या युद्धविराम सुरू आहे. त्याला धक्का पोहोचू नये, यासाठी आतापर्यंत अमेरिकेने येमेनमधील हौथी तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केलेले नाहीत. परंतु आता बायडेन सरकारचा संयम सुटत असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘आमचा संदेश आता स्पष्ट आहे. हे बेकायदा हल्ले तात्काळ संपवण्याची आणि बेकायदा ताब्यात घेतलेली जहाजे आणि क्रूची सुटका करण्याची मागणी करतो,’ असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. ‘हौथी संघटनेने नागरिकांचे जीवन, जागतिक अर्थव्यवस्था आणि प्रदेशातील जलमार्गांमध्ये व्यापाराचा मुक्त प्रवाहाला धोका निर्माण केल्यास त्यांना परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल, असा लेखी इशारा दिला आहे. या निवेदनावर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहारीन, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, डेन्मार्क, इटली, जपान, सिंगापूर आणि नेदरलँड्स यांनीदेखील स्वाक्षरी केली आहे.

या अंतिम इशारा दिल्यानंतर काही तासांनंतरच हौथी-नियंत्रित येमेनमधून सशस्त्र मानवरहित जहाज पाठवण्यात आले. हे जहाज अमेरिकेचे नौदल आणि व्यावसायिक जहाजांपासून दोन मैल अंतरावर थांबले आणि त्याचा स्फोट झाला. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या नौदल मोहिमेचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल ब्रॅड कूपर म्हणाले की, लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर हल्ले केल्यापासून हौथींनी मानवरहित जहाज वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, त्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांचा वापर वाढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी, इराणच्या नौदलाने जलमार्गावर युद्धनौकांचा ताफा तैनात करण्याची घोषणा केली. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रदेशात आधीच इराणी गुप्तहेर जहाज असूनही त्यात युद्धनौका पाठवणे म्हणजे इराण हा हौथींना पाठिंबा देत असल्याचे द्योतक आहे. परंतु इराणच्या युद्धनौकांची अमेरिकेच्या नौदल जहाजांशी संघर्ष करण्याची कोणतीही योजना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिजबुल्लाह या शक्तिशाली लेबनीज दहशतवादी गटानेही बेरूत उपनगरात हमास नेता सालेह अरोरी यांच्या झालेल्या हत्येचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. हमासची एक प्रमुख समर्थक असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे दक्षिणेतील उपनगरांवर नियंत्रण आहे. तसेच, ही संघटना काही महिन्यांपासून इस्रायली सैन्यासोबत संघर्ष वाढवण्यात गुंतलेली आहे.

इराणमधील केरमन येथील इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या स्फोटांनंतर परिस्थिती अधिक विदारक झाली आहे. या स्फोटासाठी इराणने इस्त्रायलला दोष देण्यास तत्परता दाखवली, तर युरोपियन आणि अमेरिकन अधिकार्‍यांनीही हा हल्ला इस्त्रायलींनी केल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुख्य शिल्पकाराला बाहेर काढण्यापासून ते विशिष्ट आण्विक आणि क्षेपणास्त्र उडवण्यापर्यंत इराणविरुद्धच्या त्यांच्या बहुतेक कृती अत्यंत जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना संभाव्य गुन्हेगार आहे. गुरुवारी झालेल्या स्फोटांची जबाबदारी आयएसने घेतली असली तरी इराणने अद्याप हा दावा मान्य केलेला नाही, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

अनेक अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे व्यापक युद्ध सुरू होईल की नाही, हे सांगणे खूप घाईचे ठरेल. लेबेनॉन सीमेवर संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याशिवाय इस्रायलने अरौरीवर हल्ला केला नसता, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र अरौरी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि युरोपमध्ये संघर्ष वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रादेशिक युद्ध वाढण्याचा धोका १५ टक्क्यांपासून ते ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे नाटोचे माजी कमांडर निवृत्त ऍडमिरल जेम्स स्ताव्रिदिस यांनी सांगितले. युद्धाची शक्यता तुलनेने कमी मात्र पूर्वीपेक्षा जास्त आणि अस्वस्थ करणारी असल्याचे ते सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा