26 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरदेश दुनियाआफ्रिकेत जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची तीन जागतिक उपक्रमांची मांडणी

आफ्रिकेत जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची तीन जागतिक उपक्रमांची मांडणी

Google News Follow

Related

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू झालेल्या जी २०  शिखर परिषदेत उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक विकास प्राधान्यक्रमांचे पुनर्निर्धारण करण्याचे आवाहन केले. समावेशक, शाश्वत आणि सभ्यताधारित विकास मॉडेल स्वीकारण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी जागतिक प्रगतीचे मोजमाप नव्याने परिभाषित करण्याची गरज व्यक्त केली. आफ्रिका प्रथमच या शिखर परिषदेचे यजमान असल्याने हा क्षण अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘कोणालाही मागे न ठेवता समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकास’ या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारताने मांडलेले ‘समग्र मानववाद’ हे संतुलित विकासाचे आदर्श मॉडेल ठरू शकते. या संदर्भात त्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सुरक्षा या क्षेत्रांत तीन मोठी जागतिक उपक्रमांची घोषणा केली.

मोदी यांनी शाश्वत जीवनशैलीच्या पारंपरिक पद्धती जतन करण्यासाठी जी २० कडून जागतिक भांडार निर्माण करण्याचा प्रस्ताव केला.

भारताच्या इंडियन नॉलेज सिस्टिम उपक्रमाचा आधार घेऊन हे भांडार विकसित होऊ शकते. आरोग्य, पर्यावरण, सामाजिक एकात्मता आणि निसर्गसंतुलनाशी संबंधित ज्ञान संग्रहित होईल. भावी पिढ्यांसाठी आदिवासी, स्थानिक आणि सांस्कृतिक शहाणपणा जतन केला जाईल.

जागतिक प्रगतीसाठी आफ्रिकेचा उदय अत्यंत महत्त्वाचा असल्याचा भर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिका खंडातील वाढत्या युवकसंख्येला लक्षात घेऊन एक महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमाचे नाव आहे जी २०–आफ्रिका स्किल्स मल्टिप्लायर इनिशिएटिव्ह. हे प्रशिक्षकांना तयार करणाऱ्या मॉडेलवर आधारित असून, सर्व G20 सदस्य देशांच्या संयुक्त सहकार्याने राबवले जाणार आहे. त्याचे उद्दीष्ट पुढील दहा वर्षांत आफ्रिकेत १० लाख प्रमाणित प्रशिक्षक तयार करणे.

हे प्रशिक्षक पुढे विविध क्षेत्रांमध्ये कोट्यवधी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करतील आणि विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर पात्र manpower तयार करतील.

मोदी यांनी हेही नमूद केले की, भारत आणि आफ्रिका यांच्यात दीर्घकाळापासून भागीदारी आहे. भारताच्या जी २० अध्यक्षतेदरम्यानच आफ्रिकन युनियनला जी-२० चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले होते, ही भागीदारी मजबूत करण्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मंत्री गोयल यांनी घेतला वर्ल्ड-क्लास मोबिलिटी टेक्नॉलॉजीचा अनुभव

शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत हार मानू नका!

व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून

मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा

जगभरात फेंटानिलसारख्या अत्यंत घातक सिंथेटिक (कृत्रिम) ड्रग्जचा वाढता प्रसार पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा पदार्थांमुळे सार्वजनिक आरोग्यावर, सामाजिक स्थैर्यावर आणि जागतिक सुरक्षा व्यवस्थांवर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल इशारा दिला. याच संदर्भात त्यांनी ड्रग–टेरर नेक्ससला रोखण्यासाठी जी २० ची स्वतंत्र पुढाकार योजना राबवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे उद्दिष्ट आर्थिक, प्रशासकीय आणि सुरक्षा आराखडे एकत्र आणून ड्रग्स आणि दहशतवाद यांच्यातील नात्याला पूर्णतः उध्वस्त करण्याचे आहे.

या योजनेत पुढील गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

१) ड्रग तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे उच्चाटन

२) बेकायदेशीर पैशांच्या प्रवाहावर नियंत्रण

३) दहशतवादी संघटनांच्या निधी उभारणीचे स्रोत कमजोर करणे

मोदी यांनी म्हटले की, हा आव्हानात्मक मुद्दा हाताळण्यासाठी जगभरात एकत्रित आणि ठोस कारवाईची आवश्यकता आहे. शिखर परिषदेचा भर समावेशक आणि टिकाऊ विकासावर असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी आफ्रिकेची ऐतिहासिक भूमिका या मंचावर एक महत्त्वपूर्ण “मार्ग सुधारणा” करण्याची संधी असल्याचे म्हटले. ज्ञानविषयक देवाणघेवाण, खंडस्तरावर कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोके यांवर आधारित त्यांच्या सुचना पुढील दशकाच्या जागतिक सहकार्यास आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असा त्यांचा विश्वास आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा