29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरधर्म संस्कृतीमुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा

मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा

६ डिसेंबर या बाबरी पतनाच्या दिवशी सुरुवात करण्याची घोषणा

Google News Follow

Related

प. बंगालमध्ये मोठा राजकीय वाद उसळला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी येत्या ६ डिसेंबर रोजी मुरशिदाबाद येथे ‘बाबरी मस्जिद’ नावाच्या प्रस्तावित मशिदीचा भूमिपूजन करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत असलेल्या ऐतिहासिक बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या घटनेचा हा दिवस वार्षिक स्मृतिदिन म्हणून ओळखला जातो.

भारतपूर मतदारसंघाचे हे आमदार यांनी सांगितले की, मशिदीची घोषणा मागील वर्षी करण्यात आली होती आणि समारंभासाठी सुमारे २ लाख लोक उपस्थित राहतील, तर ४०० हून अधिक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतील. मशिदीचे बांधकाम सुमारे तीन वर्षे चालेल, असे कबीर यांनी सांगितले.

भाजपाची प्रतिक्रिया

या वक्तव्यावर भाजपने तीव्र टीका करत तृणमूलवर “धर्माधारित राजकारण” आणि “मतलबी तुष्टीकरण” केल्याचा आरोप केला. भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल म्हणाल्या, “कोणीही मंदिर किंवा मशिद बांधू शकतो, पण तृणमूल धर्माच्या नावावर राजकारण करते. त्यांनी ठरवलेली तारीख (६ डिसेंबर) स्वतःच सगळे सांगते. अल्पसंख्याकांसाठी तृणमूसने आत्तापर्यंत नेमके काय केले?”

हे ही वाचा:

कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी

“ती चूक होती आणि आता…” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय दिले उत्तर?

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

नितीशकुमारांनी गृहमंत्रीपद भाजपाला दिले, खातेवाटप जाहीर

भाजप नेत्या प्रियांका टिब्रेवाल यांनी म्हटले, “तृणमूलचे सेक्युलरिझम हे धर्मनिहाय आहे. ते बाबरी मशीद पुन्हा उभारणार म्हणतात, पण त्यात कोणाला बोलावणार? रोहिंग्या? जे एसआयआर तपासणीमुळे सीमेवर पळाले आहेत? हे फक्त तुष्टीकरण आहे.”

भारतपूरचे आमदार कबीर यांनी सांगितले की ‘बाबरी’ नावाच्या मशिदीचे भूमिपूजन ६ डिसेंबर रोजी बेलडांगा (मुरशिदाबाद) येथे होईल. कबीर म्हणाले, “मशिद तीन वर्षांत पूर्ण होईल. मागील वर्षी १२ डिसेंबरला मी याची घोषणा केली होती. कार्यक्रमाला दोन लाख लोक येतील आणि व्यासपीठावर ४०० मान्यवर असतील.”

६ डिसेंबर रोजी तृणमूलचा मोठा कार्यक्रमही

याच दिवशी कोलकात्यात TMC च्या विशाल सभेत मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि अभिषेक बनर्जी हे ‘सामहती दिवस’ निमित्त भाषण करणार आहेत. हा दिवसही 1992 मधील बाबरी पाडण्याच्या घटनेला समर्पित आहे. राज्यात सुरु असलेल्या Special Intensive Revision (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एकता व सौहार्दाचा संदेश देण्याचा TMC चा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

पण कबीर यांनी सांगितले की ते कोलकात्याचा कार्यक्रम टाळून बेलडांगातील भूमिपूजन पाहणार. त्यांनी सांगितले की 1992 पासून ते दरवर्षी 6 डिसेंबर ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करतात.

तृणमूलशी आधीपासूनच दुरावा

कबीर यांनी यापूर्वीही पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी नवीन पक्ष स्थापन करण्याची धमकी ते देत आहेत. त्यांनी बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांच्याशीही संघर्ष केला असून तृणमूलने त्यांना अनेक वेळा कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. पक्षाची बदनामी करणारी वक्तव्ये केल्याबद्दल त्यांच्यावर अनेकदा कारवाई झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा