26 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरक्राईमनामाभाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या

भाषण करत असतानाच ट्रम्प यांचे विश्वासू चार्ली कर्क यांच्यावर झाडल्या गोळ्या

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांची गुरूवार, ११ सप्टेंबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. युटा व्हॅली विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मानेला गोळी लागल्यामुळे कर्क यांचा मृत्यू झाला.

चार्ली कर्क यांनी टर्निंग पॉइंट युएसए या गटाची सहस्थापना केली होती. तसेच ते डोनाल्ड ट्रम्प यांचे यांचे जवळचे सहकारी म्हणूनही ओळखले जायचे. त्यांना गोळी लागल्यानंतर टिम्पानोगोस प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर काही तासांतच त्यांना मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्यांचा असा समज आहे की, गोळीबार करणाऱ्याने छतावरून गोळीबार केला. मात्र, अधिक तपशील देण्यास त्यांनी सध्या नकार दिला आहे. या घटनेनंतर लगेचच दोघांना अटक करण्यात आली, परंतु तपासकर्त्यांना चार्ली कर्कच्या गोळीबाराशी कोणताही संबंध आढळला नाही म्हणून चौकशी केल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. जॉर्ज झिन याला प्रथम संशयित म्हणून ताब्यात घेतले . नंतर त्याला सोडण्यात आले. तसेच दुसरा संशयित, जकारिया कुरेशी, याला ताब्यात घेण्यात आले आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले. यापैकी कोणत्याही व्यक्तीचा गोळीबाराशी सध्या कोणताही संबंध नाही. गोळीबार करणाऱ्याचा तपास आणि शोध सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कर्क यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रविवारपर्यंत अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले, “आपण सर्वांनी चार्ली कर्कसाठी प्रार्थना केली पाहिजे. तो एक उत्तम माणूस होता. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.”

हे ही वाचा

दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित तिघांना अटक; पाकिस्तानी संबंध उघड

“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा प्रताप अंगरक्षकाला चापट; शिवीगाळ |

…म्हणून नेपाळ ढेपाळला! |

२०१२ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी कर्कने शिकागोमध्ये टी पार्टी कार्यकर्ते विल्यम मॉन्टगोमेरी यांच्यासोबत टर्निंग पॉइंट यूएसए सुरू केले. हा गट कॉलेज कॅम्पसमध्ये वेगाने पसरला. या गटासाठी एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा ते ट्रम्प यांच्या सुरुवातीच्या आणि सर्वात मजबूत तळागाळातील समर्थकांपैकी एक बनले. २०१६ च्या अध्यक्षीय मोहिमेदरम्यान, कर्क यांनी डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा