27 C
Mumbai
Monday, August 8, 2022
घरदेश दुनियारशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार

रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार

Related

रशिया-युक्रेन युद्धाला चार महिने उलटले आहेत. चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धात हजारो युक्रेनियन नागरिकांचा बळी गेला आहे. यादरम्यान, रशियच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शुटर थालिता डो व्हॅले ठार झाली आहे. थालिता (३९) ही ब्राझीलची मॉडेल असून ती युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाली होती. थालिता ही एक प्रशिक्षित शार्प शूटर होती.

पुतिनच्या सैन्याविरुद्धच्या लढाईत सामील झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात थालिता ठार झाली आहे. थालिता डो व्हॅले हिने जगभरातील मानवतावादी मोहिमांमध्ये भाग घेतला आणि यापूर्वी इराकमध्ये ISIS विरुद्ध लढा दिला होता. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते.

थालिता हिच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. थलिता डो हिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. ३० जून रोजी रशियाने खार्किवमध्ये रॉकेट हल्ला केला होता. यावेळी बंकरला आग लागली. त्यात तिचा मृत्यू झाला.थालिता हिचा साथीदार डग्लस बुर्गियो याला देखील या रॉकेट हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता.

हे ही वाचा:

नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा

इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

पोलिसांनी तेलंगणातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक

आदित्य ठाकरे आता तरी संपत चाललेल्या पक्षाबद्दल बोलणार का?

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संर्घष आता शिगेला पोहोचला आहे. युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु, युद्धातून माघार घेण्यास कोणताच देश तयार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
15,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा