28.7 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला

अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला

कराराची चर्चा सुरू असतानाच तणाव वाढण्याची शक्यता

Google News Follow

इराणसोबत युद्ध संपवण्यासाठी चर्चेचे संकेत दिले जात असतानाच अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या केशम बेटावर लष्करी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका इराणवर मर्यादित स्वरूपाचे लष्करी हल्ले करत असून, त्यापैकी काही कारवाया गुप्त ठेवण्यात आल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत लवकरच समझोता होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या लष्करी कारवाया सुरूच असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये तेलाच्या किमतीत प्रति बॅरल जवळपास १० डॉलरची घसरण झाल्याचा दावा केला. तसेच, इराणला लवकरात लवकर समझोता हवा असून, दोन्ही देशांमध्ये करार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी मंगळवारी होणाऱ्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर पुन्हा हल्ले करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

केशम हे इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत असलेले सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे बेट आहे. जागतिक तेल वाहतुकीच्या दृष्टीने ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या परिसरातील इराणच्या लष्करी हालचालींवर अमेरिकेचे लक्ष आहे.

हे ही वाचा:

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!

भारतीय नागरिक असल्यासारखे वागू नका!

‘इंडी’ आघाडीच्या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडे अमेरिकेचे MQM-170 प्रकारचे ड्रोन पकडल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इराणच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिटने या ड्रोनची ओळख पटवून त्याच्या मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीवर ताबा मिळवला. त्यानंतर ड्रोन नष्ट न करता सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. हे ड्रोन पर्शियन आखाताच्या किनारपट्टीवरील आणि केशम बेटावरील इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेची माहिती मिळवण्यासाठी तैनात करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा