28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरदेश दुनियाइराणसोबत तेलव्यापार; तीन भारतीय कंपन्यांवर निर्बंध

इराणसोबत तेलव्यापार; तीन भारतीय कंपन्यांवर निर्बंध

आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेकडून कारवाई

Google News Follow

Related

इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. इराणकडून पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी केल्याचा आरोप करत अमेरिकेने भारतातील चार कंपन्यांवर आणि तीन भारतीय नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. या व्यवहारांची एकूण किंमत सुमारे ११९ दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास १,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराणच्या आर्थिक नेटवर्कवर दबाव वाढवण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन इकोनॉमिक आउटकास्ट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश इराणच्या तेल व्यापारातून मिळणाऱ्या महसुलाच्या स्रोतांवर आळा घालणे हा आहे. अमेरिकेच्या आरोपांनुसार, सदाशिव ओव्हरसीझ लिमिटेड या भारतातील कंपनीने फेब्रुवारी २०२४ ते जून २०२५ या कालावधीत सुमारे ६९ दशलक्ष डॉलर किमतीचे इराणी मूळ असलेले पेट्रोलियम पदार्थ आयात केले. यातील काही व्यवहार अमेरिकेने यापूर्वीच निर्बंध घातलेल्या बॉनजुरे कमोडिटी या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय पी पी सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रकृतीज इन्फ्रा इम्पेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी सुमारे २५ दशलक्ष डॉलर किमतीचे इराणी पेट्रोलियम पदार्थ आयात केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या तीन कंपन्यांशी संबंधित व्यवहारांची एकूण रक्कम सुमारे ११९ दशलक्ष डॉलर असल्याचे अमेरिकेने नमूद केले आहे. तर पोर्तेज पार्टनर्स एलएलपी या भारतातील कस्टम्स ब्रोकर कंपनीवर इराणमधून पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या अनेक खेप भारतात आणण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या कंपनीशी संबंधित इंद्रीसमिया अश्रफमिया शेख आणि हरीश रामचंद्र रंगी यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

तळोज्यात ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; १५ जणांवर गुन्हा

अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस

सोन्याला ‘सोन्याचा भाव’; चांदीची मात्र घसरण

“नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे”; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप

अमेरिकेची ही कारवाई केवळ संबंधित कंपन्यांपुरती मर्यादित नसून, इराणच्या तेल आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर दबाव वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. अमेरिकेने अलीकडेच इराणशी संबंधित सुमारे ६० व्यक्ती, संस्था आणि जहाजांवर निर्बंध जाहीर केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा