29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेची मानवरहित पाणबुडी इराणच्या ताब्यात?

अमेरिकेची मानवरहित पाणबुडी इराणच्या ताब्यात?

अमेरिकेने सांगितले ‘तांत्रिक बिघाड’

Google News Follow

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहचलेला असताना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ अमेरिकेची ‘डाइव्ह-एलडी’ (Dive-LD) मानवरहित पाणबुडी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ही कारवाई गुप्तचर मोहिमेदरम्यान केल्याचे सांगत, कथितरीत्या ताब्यात घेतलेल्या पाणबुडीचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेची ही अत्याधुनिक मानवरहित पाणबुडी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पकडण्यात आली. मात्र, अमेरिकेने इराणचा ‘पाणबुडी पकडल्याचा’ दावा थेट मान्य केलेला नाही. अमेरिकन लष्कराने एका अंडरवॉटर ड्रोनमध्ये एक दिवस आधी तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट केले आहे. हा ड्रोन प्रादेशिक समुद्राच्या पाहणीसाठी वापरला जात होता, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सांगितले की, बिघाड झालेला ड्रोन जुन्या मॉडेलचा होता आणि त्यामध्ये संवेदनशील माहिती, वर्गीकृत सोनार किंवा रडार उपकरणे नव्हती. मात्र, अमेरिकेने बिघाड झालेला ड्रोन आणि इराणने ताब्यात घेतल्याचा दावा केलेला Dive-LD हे एकच उपकरण आहे का, याची पुष्टी केलेली नाही.

हे ही वाचा:

‘दीपस्तंभ’ने दिली साथ; दिव्यांगत्वावर केली मात

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

दिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?

काय आहे Dive-LD?

Dive-LD हे अमेरिकन कंपनी Andurilने विकसित केलेले मोठे स्वायत्त मानवरहित पाण्याखालील वाहन आहे. समुद्राच्या तळाचे मॅपिंग, गुप्तचर माहिती गोळा करणे, माइन शोधणे आणि समुद्राखालील केबल्स-पाइपलाइनसारख्या पायाभूत सुविधांची तपासणी यांसारख्या कामांसाठी अशा वाहनांचा वापर केला जाऊ शकतो. हे वाहन ६ हजार मीटरपर्यंत खोलीत जाऊ शकते आणि सुमारे १० दिवस बेसवर परत न येता कार्य करू शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा