पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्ष सुरू असून नुकत्याच झालेल्या चकमकीत १० हून अधिक सैनिक आणि सामान्य नागरिक ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले की, नैऋत्य आणि वायव्येकडील प्रमुख सीमा चौक्यांवर तालिबान्यांनी केलेले दोन हल्ले परतवून लावण्यात आले, बुधवारी पहाटे दक्षिण कंधार प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील स्पिन बोल्डकजवळ झालेल्या हल्ल्यात सुमारे २० तालिबानी ठार झाले.
रॉयटर्सने सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, पाकिस्तानच्या सीमावर्ती ओराकझाई जिल्ह्यात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा पाकिस्तानी निमलष्करी सैनिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा एकदा जिल्ह्यात हलक्या आणि जड शस्त्रांनी हल्ले केल्याचा आरोप केला.
दरम्यान, दोन्ही देशांमधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानी मंत्र्यांना चर्चेसाठी प्रवेश नाकारल्यामुळे, इस्लामाबादने मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी कतार आणि सौदी अरेबियाशी संपर्क साधला आहे.
इस्लामाबादने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या छावण्यांना लक्ष्य केल्यानंतर गेल्या आठवड्यात हे युद्ध सुरू झाले. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला की पाकिस्तानने स्पिन बोल्दाक जिल्ह्यात गोळीबार करून नवीन शत्रुत्वाची सुरुवात केली, ज्यामध्ये १५ नागरिक ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले. जिल्ह्यातील एका रुग्णालयाने सांगितले की जखमींमध्ये ८० हून अधिक महिला आणि मुले आहेत.
हेही वाचा..
इलाहाबाद हायकोर्टने काय दिला निर्णय ?
६१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण एक मोठा टप्पा
अंसारी अलीमुद्दीन, नफीस यांच्या घरांवर ईडीची छापेमारी
“हिंदूंसाठी विचार करणारी कोणतीही संघटना काँग्रेस सहन करू शकत नाही”
तालिबानने दावा केला आहे की त्यांच्या सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आणि पाकिस्तानी शस्त्रे, टँक जप्त केले. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराने तालिबानवर नैऋत्य आणि वायव्येकडील दोन प्रमुख सीमा चौक्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. दोन्ही हल्ले परतवून लावण्यात आले, ज्यामध्ये सुमारे ३० तालिबानी मारले गेले.







