28 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरदेश दुनियादेशभरात व्हॉटसएपचा सर्व्हर डाऊन

देशभरात व्हॉटसएपचा सर्व्हर डाऊन

पारी १२.३० वाजल्यापासून व्हॉटसएपची सेवा बंद

Google News Follow

Related

इन्स्टंट मेसेजिंग व्हॉटसएपची सेवा मंगळवारी भारतात ठप्प झाली आहे. वास्तविक, हा डाऊन व्हॉटसएप चॅट्स आणि ग्रुप चॅटमध्ये दिसत आहे. व्हॉटसएपवर मेसेज पाठवण्यात आणि पाहण्यातही यूजर्सना अडचणी येत आहेत. आज दुपारी १२.३० वाजल्यापासून व्हॉटसएपची सेवा बंद करण्यात आली आहे. सर्वप्रथम व्हॉटसएप ग्रुप चॅटमध्ये मेसेजिंगमध्ये अडचण आली. आता युझर्स सामान्य चॅटमधूनही संदेश पाठवू शकत नाहीयेत. सर्व्हर डाउन होऊन ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.

आतापर्यंत ११ हजारांहून अधिक युजर्सनी सोशल मीडियावर व्हॉटसएप सेवा बंद झाल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मेटाची व्हॉटसएप सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. व्हॉटसएपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी. स्वतंत्र ट्रॅकिंग पोर्टल ‘डाउनडिटेक्टर’नेही व्हॉटसएपप सेवा खंडित झाल्याची पुष्टी केली आहे. सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटसएपचा सर्व्हर डाऊन झाला आहे. भारतातील युजर्सना व्हॉटसएपवरून मेसेज पाठवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

सर्व्हर डाउन म्हणजे काय

सर्व्हर हा एक संगणक किंवा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो कोणत्याही डिव्हाइसला डेटा सेवा, संसाधन, प्रोग्राम किंवा कार्यक्षमतेशी जोडतो. या संपूर्ण नेटवर्कला क्लायंट-सर्व्हर मॉडेल म्हणतात. जेव्हा सर्व्हर स्वतःशी कनेक्ट केलेल्या इतर उपकरणांना सेवा देणे थांबवतो किंवा सर्व्हर कार्य करणे थांबवतो तेव्हा त्याला सर्व्हर डाउन म्हणतात. दुसऱ्या शब्दांत त्याला सर्व्हर क्रॅश असेही म्हणतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा