35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियादोन-अडीच तासांनी व्हॉट्सअप सुरू; पण ट्विटरवर मिम्सचा पाऊस

दोन-अडीच तासांनी व्हॉट्सअप सुरू; पण ट्विटरवर मिम्सचा पाऊस

लोकांनी वळविला ट्विटरकडे मोर्चा

Google News Follow

Related

तब्बल २ ते अडीच तास व्हॉट्सअप सेवा बंद पडल्यामुळे जगभरात सगळेच खोळंबले. पण या निमित्ताने लोकांनी आपला मोर्चा ट्विटरकडे वळविला. त्यावरून सोशल मीडियावर मिम्स आणि विनोदांचा पाऊस पडला. व्हॉट्सअपला जणू ग्रहणाच्या दिवशीच ग्रहण लागले की काय, अशी भावना लोकांनी व्यक्त केली. मात्र दोन अडीच तासांनी अखेर व्हॉट्सअप सुरू झाले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे चित्र होते.

एक खचाखच भरलेली रेल्वे येतानाचा व्हीडिओ शेअर करत ट्विटरवर एकाने म्हटले होते की, या संख्येने लोक व्हॉटसअप बंद असल्यामुळे ट्विटरकडे धाव घेत आहेत.

एका नेटकऱ्याने मिस्टर बिनचे चार फोटो टाकले आहेत. त्यात मिस्टर बिन एका शेताशेजारी वाट पाहात उभे असल्याचे दिसतो. घड्याळात पाहात किती वेळ वाट पाहावी लागेल असे हावभाव मिस्टर बिनच्या चेहऱ्यावर आहेत. नंतर तो खाली बसून प्रतीक्षा करत आहे शेवटी तर तो शेतातच झोपून वाट पाहू लागतो. अशीच काहीशी अवस्था नेटकऱ्यांची झाल्याचे या चार फोटोंमधून दाखविण्यात आले आहे.

मजबूर चित्रपटातील अमिताभ बच्चनचे चार फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले. त्या चित्रपटात अमिताभला डोकेदुखीचा त्रास असतो. ते फोटो टाकून दिवाळीदरम्यान नासाने उपग्रहाच्या माध्यमातून काढलेले फोटो व्हॉट्सअप बंद असल्याने शेअर करता न आल्याने अशी अवस्था झाल्याचे त्यातून दाखविण्यात आले आहे.

एका फोटोत व्हॉट्सअपचा मार्क झुकरबर्ग वायरींच्या जंजाळासमोर उभा राहून नेमके कशामुळे व्हॉट्सअप बंद झाले आहे, या विवंचनेत पडल्याचे दाखविण्यात आले आहे.

अक्षय कुमारच्या चित्रपटातील एक प्रसंगही असाच शेअर करण्यात आला आहे. त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, हे जॉनी लिव्हरच्या मागे धावत असल्याचे दिसते. व्हॉट्सअप बंद असल्यामुळे लोक अशापद्धतीने ट्विटरकडे धाव घेत आहेत, असे दाखवून त्यावरून खिल्ली उडविण्यात आली आहे.

एका इमारतीतील गॅलरीत प्रचंड संख्य़ेने लोक जमल्याचे दाखवून ट्विटरवर काही काळासाठी कशी गर्दी झाली आहे, हे दाखवत व्हॉट्सअप बंद असल्याचे परिणाम काय होत आहेत, यावरून गंमत केली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा