31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरदेश दुनियानुसता राडा!! व्हॉट्सऍप बंद; पण ट्विटर सुरूच

नुसता राडा!! व्हॉट्सऍप बंद; पण ट्विटर सुरूच

Google News Follow

Related

नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली आणि घेतली फिरकी

व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम काही काळ बंद झाल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. मात्र ट्विटरचे काम सुरूच होते, त्यामुळे सोशल मीडियावर अवलंबून असलेल्यांची चांगलीच कोंडी झाली. पण या परिस्थितीतही लोकांनी याच्यावर मिम्स आणि विनोदांचा पाऊस पाडला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील नेटकरी अगदीच हतबल झाले होते. तरीही ट्विटरवरून त्यांनी घडलेल्या या घटनेची मजाही लुटली.

सर्व्हर डाऊन नावाने ट्विटरवर हे ट्रेंडिग सुरू होते. एकाने वायरींच्या जंजाळात अडकलेल्या एका व्यक्तीचा फोटो टाकून फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग नेमकी काय तांत्रिक समस्या आहे हे शोधत असल्याचा विनोद केला. एकाने ट्विट केले त्यात, रेल्वे ट्रॅकवरून जाणारा एक ट्रक दाखविला आणि त्याला फेसबुकची उपमा दिली. दुसऱ्या टोकाकडून येणारी एक रेल्वे त्या ट्रकला उडवून पुढे जाते त्या रेल्वेची तुलना ट्विटरशी केली.

फेसबुक, व्हॉट्सअप बंद झाल्यानंतर ट्विटरच्या कार्यालयात काय जल्लोषाचे वातावरण आहे, याचाही एक फोटो टाकून त्याचीही फिरकी घेतली गेली. एका ट्विटमध्ये फुटबॉलचा प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना थोबाडीत मारत असल्याचे दाखविले आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये आपल्या सहकाऱ्यांची काहीशी अशीच अवस्था केली असेल असे दाखविण्याचा त्यात उद्योग करण्यात आला.

हे ही वाचा:

धक्कादायक!! लहान मुलांवरील गुन्ह्यात दररोज होतेय वाढ

डॉक्टरांनी सरकारची नस अचूक पकडली; पुन्हा कामावर रुजू होणार

आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

लखीमपूर प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन?

 

एका ट्विटमध्ये खचाखच भरलेली एक रेल्वे ट्रॅकवरून येताना दाखविली आहे. आणि मेसेज लिहिला आहे की, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप बंद झाल्यामुळे ट्विटरकडे वळलेले लोक. एका ट्विटमध्ये तर सगळीकडे आग लागलेली आहे मात्र एकजण झोपाळ्यावर झुलण्याचा आनंद घेतो आहे असे दाखविण्यात आले आहे. झोपाळ्यावर झुलणारा तो मुलगा ट्विटर असल्याचे सुचविण्याचा हा प्रयत्न त्या नेटकऱ्याने केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा