29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरदेश दुनियाआयएएस-आपीएस सेवेला ‘रामराम’; १४ महिन्यांत ७ अधिकाऱ्यांचे राजीनामे

आयएएस-आपीएस सेवेला ‘रामराम’; १४ महिन्यांत ७ अधिकाऱ्यांचे राजीनामे

युवा अधिकाऱ्यांच्या निर्णयाने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Google News Follow

उत्तर प्रदेशातील २०१३ बॅचच्या चर्चित आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी १३ वर्षांच्या सेवेनंतर राजीनामा दिल्याने देशातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १४ महिन्यांत ४० वर्षांखालील सहा अधिकाऱ्यांसह एकूण सात युवा आयपीएस अधिकाऱ्यांनी सेवा सोडली आहे. त्यामुळे देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आयएएस-आयपीएस सेवांमधून अधिकारी बाहेर पडण्यामागची कारणे काय आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामधील काही प्रकरणे सध्या विशेष चर्चेत आहेत. बिहारमधील नुरुल होदा आणि काम्या मिश्रा, मध्य प्रदेशातील अभिषेक तिवारी, आंध्र प्रदेशातील सिद्धार्थ कौशल, उत्तराखंडमधील लोकेश्वर सिंह, ओडिशातील रचिता जुयाल आणि जगमोहन मीणा या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे सेवा सोडली. काही अधिकाऱ्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी कॉर्पोरेट क्षेत्र, सायबर सिक्युरिटी किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये करिअर करण्याला प्राधान्य दिले. ओडिशा कॅडरचे ३७ वर्षीय जगमोहन मीणा यांनीही वैयक्तिक कारणे आणि भविष्यातील करिअरच्या नियोजनाचा हवाला देत राजीनामा दिला.
हे ही वाचा:
भारताचे चौथे विमान ११ टन साहित्य घेऊन काठमांडूत दाखल

जिओ प्लॅटफॉर्म्सचा विक्रमी आयपीओ

पंजाबच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; महिला इन्फ्लुएन्सरला झाडाला बांधून पेटवले

रंजक इतिहास मांडणाऱ्या मुंबईकर कृष्णा शेषाद्रींशी मोदींनी केली ‘बात’

मात्र, या घटनांवरून आयएएस-आयपीएस सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजीनाम्यांची लाट आली आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या सेवांमधून बाहेर पडणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. मात्र, बदलत्या काळानुसार अधिकाऱ्यांच्या करिअरच्या अपेक्षा बदलत असल्याचे या घटनांतून दिसून येते. राजकारण, खासगी क्षेत्रातील आकर्षक संधी, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील काम आणि स्वतःच्या आवडीनुसार नवे क्षेत्र निवडण्याची इच्छा यामुळे काही अधिकारी प्रतिष्ठेची सरकारी सेवा सोडण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे हा केवळ राजीनाम्यांचा मुद्दा नसून, नव्या पिढीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलत्या करिअरविषयक मानसिकतेचेही हे संकेत मानले जात आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा