33 C
Mumbai
Friday, April 10, 2026
घरदेश दुनियाअभिनेता विल स्मिथने का मारली सूत्रसंचालकाच्या श्रीमुखात?

अभिनेता विल स्मिथने का मारली सूत्रसंचालकाच्या श्रीमुखात?

Google News Follow

Related

हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता विल स्मिथ याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करत असलेल्या ख्रिस रॉक या विनोदवीराच्या श्रीमुखात भडकावल्याचा व्हीडिओ आणि त्यासंदर्भातील बातम्या चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. रविवारी झालेल्या या सोहळ्यात स्मिथच्या पत्नीविषयी ख्रिस रॉकने केलेल्या विधानानंतर स्मिथ आपल्या जागेवरून उठला आणि त्याने रॉकच्या कानशिलात वाजविली.

सर्वोत्तम डॉक्युमेंट्रीच्या पुरस्कारासंदर्भात बोलत असताना रॉकने विनोद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याने स्मिथची पत्नी जॅडा पिन्केटबद्दल वक्तव्य केले आणि ते स्मिथला आवडले नाही. जॅडाने अगदी बारीक केलेल्या केसांमुळे ती  जी.आय. जेन या चित्रपटातील डेमी मूरसारखी दिसत असल्याची टिप्पणी रॉकने केली आणि स्मिथ भडकला.१९९७ मध्ये आलेल्या जी. आय. जेन या चित्रपटात डेमी मूरने अभिनय केला होता. त्यात तिचे केस अगदी बारीक दाखविले आहेत.

रॉकच्या त्या विधानावर रागावल्यामुळे स्मिथ बसलेल्या जागेवरून तडक उठला आणि रॉककडे जात त्याच्या कानाखाली वाजविली. माझ्या बायकोचे नाव तू घेऊ नकोस, असे ओरडत तो आपल्या जागेवर बसला. त्यावेळी या सोहळ्याची साऊंडसिस्टीम काही सेकंद निर्मात्यांनी बंद ठेवली होती.

हे ही वाचा:

१ एप्रिलला पंतप्रधान मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार

ड्रेनेज टाकीत गाय पडली आणि…

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

त्या ‘मातोश्रीं’ना कोटी कोटी प्रणाम!

 

जॅडा पिन्केट हिला ऍलोपेशिया हा विकार असून तिने २०१८मध्ये ते जाहीर केले होते. त्यावर उपचार सुरू असल्याचे तिने सांगितले होते. या विकारात केस मोठ्या प्रमाणावर गळायला प्रारंभ होतो. परिणामी, जॅडाच्या डोक्यावरील केस कमी झालेले दिसतात. पण त्याची थट्टा रॉकने उडविली.

ही घटना घडल्यावर स्मिथने नंतर माफी मागितली. पण हा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून त्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा