29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरक्राईमनामापोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

पोस्ट टाकली म्हणून शिवसैनिकांनी मारले

Related

जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन शिवसैनिकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.

धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर हेमंत हे चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शिवसैनिकांनी हेमंत यांच्यावर पाळत ठेवली. चित्रपट पाहून आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना चित्रपटगृहाबाहेर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

हेमंत यांनी केलेल्या पोस्ट संदर्भात त्यांच्याकडून शिवसैनिकांनी माफी मागून घेतली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडून दिलं.

हे ही वाचा:

त्या ‘मातोश्रीं’ना कोटी कोटी प्रणाम!

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

‘मन की बात’ मधून गोदावरी स्वच्छतेसाठी झटणाऱ्या नंदकिशोर यांचे कौतुक

“ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट कोणी टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,” असा इशाराच शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला.

हेमंत यांना मारहाण करताना घटनास्थळी शिवसैनिकांबरोबरच शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा