24 C
Mumbai
Saturday, January 10, 2026
घरदेश दुनियापाकिस्तानी राजदूताने दाखवल्या बेटकुळ्या, अणुहल्ला करण्याची दिली धमकी!

पाकिस्तानी राजदूताने दाखवल्या बेटकुळ्या, अणुहल्ला करण्याची दिली धमकी!

पहलगाम हल्ल्याप्रकरणी एएनआयकडून वेगवेगळ्या बाजूने तपास सुरु 

Google News Follow

Related

गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर , रशियातील पाकिस्तानच्या राजदूतांनी भारताला उघडपणे धमकी दिली आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवला तर पाकिस्तान केवळ पारंपारिकच नव्हे तर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.

रशियन टेलिव्हिजन चॅनेल आरटीशी बोलताना पाकिस्तानी राजदूत राजदूत मुहम्मद खालिद जमाली म्हणाले, भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस संकेत आहेत. खालिद जमाली यांनी दावा केला की काही लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानच्या काही भागात हल्ला करण्याची योजना आहे. यामुळे आपल्याला असे वाटते की हल्ला जवळ आला आहे आणि तो कधीही होऊ शकतो.

आरटीच्या वृत्तानुसार, जमील म्हणाले की, पाकिस्तान कोणत्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, ज्यामध्ये पारंपारिक आणि अण्वस्त्रांचा समावेश असेल. सिंधू पाणी करार थांबवण्याच्या भारताच्या निर्णयावर जमाली म्हणाले, जर भारताने खाली जाणारे पाणी थांबवले किंवा वळवले तर ते पाकिस्तानविरुद्ध युद्ध मानले जाईल. आणि त्याचे उत्तर पूर्ण ताकदीने दिले जाईल.

हे ही वाचा : 

“सिंधूचे पाणी अडवल्यास हल्ला करू” पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून पोकळ धमकी

विभाजनवादी शक्तींना शीख समाज थारा देत नाही, आम्ही मोदींच्या पाठीशी

पहलगाम हल्ल्यातील संशयित विमानात असल्याच्या संशयावरून कोलंबोमध्ये विमानाची झडती

छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये ८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा

दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यापासून पाकिस्तानला भारताकडून प्रत्युत्तराची भीती वाटत आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी तशी भीती व्यक्त केली असून भारताला बिनबुडाच्या धमक्या देत आहेत. या हल्ल्याचा एएनआयकडून तपास सुरु आहे. चौकशीसाठी काश्मीरमधील तीन हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओवर ग्राउंड वर्कर्सना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या बाजूने पथक तपास करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा