28 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरक्राईमनामाओमानमधून मुसक्या आवळून झाकीर नाईकला भारतात आणणार?

ओमानमधून मुसक्या आवळून झाकीर नाईकला भारतात आणणार?

झाकीर नाईकच्या विरोधात भारताने कारवाई सुरु. भारतीय गुप्तचर संस्था ओमानी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात.

Google News Follow

Related

कट्टर इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या विरोधात भारताने कारवाई सुरु केली आहे. झाकीर नाईकला ताब्यात घेण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था आधीपासूनच ओमानी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. झाकीर नाईकला ओमानमधून अटक करून भारतात आणले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. याआधी भारताने ओमानला त्याला आपल्या देशात प्रवेश देण्यापासून रोखण्याची मागणी केली होती.

झाकीर नाईक २३ मार्चला ओमानला पोहोचणार आहेत. नाईक याला ओमानमध्ये इस्लामवर दोन व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. झाकीर नाईकचे पहिले व्याख्यान ‘कुरान अ ग्लोबल नीड’ या विषयावर आहे. ओमानच्या अकाफ आणि धार्मिक व्यवहार मंत्रालयाने आणि रमजानच्या पहिल्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी हे व्याख्यान आयोजित केले आहे. त्यानंतर त्याचे दुसरे व्याख्यान २५ मार्च रोजी सुलतान काबूस विद्यापीठात संध्याकाळी होणार आहे. नाईक तीन दिवस ओमानमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओमानमधील भारतीय दूतावास त्याला ताब्यात घेण्यासाठी आणि स्थानिक कायद्यांनुसार भारतात आणण्यासाठी संपर्कात आहे. स्थानिक अधिकारी भारत सरकारच्या विनंतीला मान्यता देतील आणि झाकीर नाईकला ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता असल्याचे भारतीय गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी म्हटले आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी कायदेशीर पथक ओमानला पाठवले जाऊ शकते.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठोठावला मुंबई हायकोर्टचा दरवाजा

पंखे थरथरले, भांडी कोसळली .. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली

आम आदमी पार्टीने लावले मोदींविरोधातले पोस्टर्स…१०० एफआयआर, ६ अटकेत

खलिस्तान समर्थक अमृतपालने रंगरूप बदलून काढला पळ! नवी माहिती आली समोर

काय आहे प्रकरण ?

झाकीर नाईकवर भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याचे आरोप आहेत. झाकीर नाईक नाईक २०१७ मध्ये मलेशियाला पळून गेला होता, तेव्हापासून तो फरार आहे. मलेशियानेही २०२० मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत नाईकला आपल्या देशात भाषण करण्यास बंदी घातली होती.त्याचवेळी, जोपर्यंत नाईक कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार नाही, असे मलेशियाने म्हटले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा