29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियापंखे थरथरले, भांडी कोसळली .. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली

पंखे थरथरले, भांडी कोसळली .. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली

पाकिस्तानलाही भूकंपाचे जोरदार धक्के . ११ जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

सीरिया-तुर्कस्तानपासून सुरु झालेला भूकंपाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भूकंप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. दिल्ली-एनसीआरसह जगाच्या विवीध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली -एनसीआर मध्ये रात्री १० वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जवळपास १५ ते २० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.पाकिस्तानलाही भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे

भूकंपाच्या धक्क्यांनी घरातील पंखे, भांडी हलू लागल्याने लोक घाबरून घराच्या बाहेर पडले. रात्रभर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून १३३ किमी आग्नेय दिशेला जमिनीपासून १५६ किमी खोलवर होता असे सांगण्यात येत आहे. दिल्लीबरोबरच हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत .भूकंपानंतर लगेचच जम्मू प्रदेशातील काही भागात मोबाईल सेवा विस्कळीत झाली. .

भीतीच्या सावटाखाली रात्र घालवली

या शक्तिशाली भूकंपामुळे दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, चंदीगड, जयपूर आणि इतर शहरांमध्ये शेकडो लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले.रात्रभर लोकांना नातेवाईकांचे फोन येत राहिले. बरेचसे लोक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आणि उद्यानात आले . दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाची भीती इतकी होती की, लोक रात्रभर भीतीच्या छायेत बाहेरच राहिले. रेल्वे स्थानक आणि रुग्णालयांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा:

राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

पाकिस्तानात ११ जणांचा मृत्यू

पाकिस्तानलाही भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.इस्लामाबाद, पेशावर, लाहोर आणि रावळपिंडीसह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र हिंदुकुशमध्ये होते. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा