32 C
Mumbai
Thursday, June 23, 2022
घरधर्म संस्कृतीउद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

Related

प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांना पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने उद्योगक्षेत्र, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुण्यात शनिवारी झालेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वार्षिक संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान कारुळकर यांना देण्यात आला. शाल, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुणेरी पगडी घालून कारुळकर यांना यावेळी गौरविण्यात आले.

केंद्रीय मंत्री महेश शर्मा, लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्यासारख्या दिग्गजांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे.

या पुरस्काराबद्दल आपण अत्यंत ऋणी असल्याचे प्रशांत कारुळकर म्हणाले. तसेच त्यांनी असेही नमूद केले की, ही संस्था एका कुटुंबासारखी आहे. जेव्हा कुटुंब मजबूत असते तेव्हा देशातील ताकद वाढते. समाजातील उगवत्या ताऱ्यांचा सन्मान या संस्थेच्या माध्यमातून होत असतो. या पुरस्कारासाठी आपला विचार केल्याबद्दल संस्थेचे मुख्याधिकारी गोविंद कुलकर्णी, रमणाचारी चक्रवर्तुळा यांचे आभार.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला होता. प्रशांत कारुळकर यांच्या पत्नी आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यादेखील यावेळी उपस्थित होत्या.

हे ही वाचा:

भाजपाचा विजय साजरा करणाऱ्या मुस्लिम युवकाला उत्तर प्रदेशात केले ठार!

एक एक रुपया जमा करून त्याने घेतली ड्रीम बाईक

लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!

दिल्लीहून श्रीनगरला जाणारं विमान खांबाला धडकलं

 

पुरस्कार वितरणानंतर मानपत्राचे वाचन करण्यात आले. प्रशांत कारुळकर यांनी प्रचंड मेहनतीने उभारलेल्या विविध उद्योगांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. बीमामंडी या विमा कंपनीसोबत शेअर बाजार, रिअल इस्टेट, ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधने, न्यूज डंका अशा विविध उद्योगांतून आपण आदर्श निर्माण केला, अशा शब्दांत प्रशांत कारुळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा