25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरधर्म संस्कृतीमुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

मुख्यमंत्र्यांकडून किल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य, प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना

प्राधिकरणाचे काम छत्रपतींचे वंशज उदयनराजे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची घोषणा

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवछत्रपतींच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर महत्त्वपूर्ण घोषणा केली. किल्ल्यांच्या संवर्धनाला महाराष्ट्रातील सरकार प्राधान्य देत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या प्राधिकरणाचे काम छत्रपतींचे वंशज उदयनराजे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे, असेही मुखमंत्र्यांनी जाहीर केले.

हे ही वाचा:

सचिनने आमच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा!

इतिहासातील इतर नायकांपेक्षा छत्रपती शिवराय अद्भूत!

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निधी सिंगची कमाल

दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधानांना भेटणार!

रायगडावरील या भव्य सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. सकाळी ८.३० पासून या सोहळ्याला प्रारंभ झाला. भारतातील विविध नद्यांमधून आणलेले जल ११०८ कलशांमध्ये ठेवण्यात आले होते. त्या कलशांमधील जलाद्वारे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे जल शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर अर्पण करण्यात आले. विविध मंत्र्यांनीही कलशातून शिवरायांना अभिषेक केला. नंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची ही मूर्ती जलाभिषेकाने शुचिर्भूत केली. नंतर सर्व मंत्रिमंडळाने शपथग्रहण करून जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे वचन दिले.

 

मुख्यमंत्री त्यानंतर भाषण करताना म्हणाले की,  छत्रपती महाराजांच्या या सुवर्णक्षणाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. ३५०व्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्याजोगा आहे. आपण भाग्यवान आहोत आपण या क्षणाचे साक्षीदार आहोत. मुख्यमंत्री म्हणून माझे भाग्य आहे की, मला याठिकाणी उपस्थित राहता आले. सुराज्याची संकल्पना राबविण्यासाठी, तो आदर्श ठेवण्यासाठी सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. महाराजांचे आशीर्वाद प्रेरणा आपल्या पाठीशी आहे. म्हणून स्वातंत्र्य केवळ भूमीचे नसते तर माणसाचे असते याची जाणीव होती. याचा जयजयकार करण्याची संधी मिळाली. छत्रपतींच्या कल्पनेतील सुराज्य आणायचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आजच्या सोहळ्याकडे महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिले आहे.  शिवरायांच्या पराक्रमामुळे स्वातंत्र्याचे क्षण अनुभवता आले. धर्म, देवळांचे रक्षण झाले. म्हणून आजचा सोहळा पाहतो आहोत. हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पूजा आहे. मंत्रिमडळ बैठकीत हे सर्वसामान्यांचे सरकार न्याय देणारे रयतेच्या हक्कांचे रक्षण करणे सरकार आहे अशी सुरुवात आम्ही केली होती. ११ महिने सरकार काम करत आहे प्रत्येक निर्णय साक्षीने घेत आहोत. हा निर्णय जनहितासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आहे. हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आपुलकी निर्माण करतो आहोत. शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले जीव की प्राण होते म्हणून किल्ल्यांच्या जतन संवर्धनाला प्राधान्य देत आहोत. दुर्ग प्राधिकरण करतो आहोत. उदयनराजेंची जी मागणी आहे, प्रतापगड प्राधिकरण करायला हवे. ते मी जाहीर करतो. प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पाहावे म्हणून जाहीर करतो.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लंडनच्या संग्रहालयातील वाघनखे, भवानी तलवार आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आम्हाला मदत करतील. सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रयत्न करत आहेत. ज्या आग्र्यात दिवाण ए आममध्ये शिवरायांचा अपमान झाला. तिथे यावर्षी आपण शिवजयंती जल्लोषात साजरी केली. अंगावर रोमांच उभे करणारा, दृष्ट लागण्यासारखा तो सोहळा होता.

 

मुख्यमंत्र्यांनी ही देखील आठवण करून दिली की, मुंबईतल्या कोस्टल रोड जी लोकांसाठी लाइफ लाइन आहे त्याचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करण्यात आले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव तर अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामकरण करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा