30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरधर्म संस्कृतीहुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?

Google News Follow

Related

हुजूरपागा पुणे, येथील मुलींच्या पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळेत “ईद ए मिलाद” उर्फ प्रेषितांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुलींना त्याग आणि प्रेमाचे, महत्व सांगितले गेले. मुलींवर सर्वधर्मसमभावाचे संस्कार व्हावेत, असा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचेही सांगितले गेले.

लक्ष्मी रस्ता, पुणे येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कै.सौ. अश्विनी देवस्थळे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर या आहेत. त्याग, प्रेम या गोष्टींचे महत्व मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी या शाळेच्या संचालकांना “ईद ए मिलाद” हाच सण योग्य वाटला. रामायण, महाभारत किंवा असंख्य संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या त्या दृष्टीने बहुधा योग्य वाटल्या नसाव्यात. ईद साजरी करून लहान मुलांच्या मनामध्ये सर्वधर्मसमभाव रुजवणे आणि ऐक्याची भावना निर्माण करणे हे उद्देश असल्याचे मुख्याध्यापिकेचे म्हणणे आहे.

पुणे ही खरेतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुण्यातच एका मान्यवर शैक्षणिक संस्थेत आपल्या हिंदू संस्कृती विषयी एवढे अज्ञान किंवा न्यूनगंडाची भावना (?) असावी, हे आश्चर्य ! “ईद ए मिलाद” हा मुस्लीम सण; ती प्रेषितांची जयंती म्हणून साजरी होते. त्यामुळे, मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांची जर खरेच मुलांना त्या संस्कृतीची ओळख करून द्यावी अशी इच्छा असेल, तर अशा कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या धर्मग्रंथांच्या सामुदायिक वाचनाने केल्यास तो हेतू अधिक लवकर साध्य होईल, असे म्हणावेसे वाटते.

आम्ही इथे त्या दृष्टीने काही महत्वाचे संदर्भ देत आहोत. सविता अनकाईकर यांनी पुढील अशा तऱ्हेच्या कार्यक्रमात त्याचा जरूर उपयोग करावा.

१. सहीह अल बुखारी २६५८ : यामध्ये असे नमूद केलेले आहे, की “बायकांमध्ये अकलेची कमतरता असते” (स्त्रियांचा एवढा भयंकर घाऊक अपमान कोणीच केला नसेल.)

२. सहीह बुखारी ५१४, सहीह मुस्लिम ५११: यामध्ये म्हटले आहे, की ‘ज्या गोष्टींमुळे प्रार्थनेचे फळ प्राप्त होत नाही किंवा प्रार्थनेत बाधा उत्पन्न होते त्या गोष्टी पुढील प्रमाणे : कुत्रा, गाढव आणि स्त्री (म्हणजे या तीन गोष्टींमुळे प्रार्थनेचे फळ प्राप्त होत नाही.) (याउलट आपल्या हिंदू संस्कृतीत, जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो, जिथे स्त्री पूजली जाते, तिथे देवता वास करतात, असे वचन आहे. “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताःII” महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा रुपात पुरुष दैवताइतक्याच स्त्री देवता ही पूजनीय मानल्या गेल्या आहेत. पंचायतन पूजेत – शिव, विष्णू, गणेश, सूर्य यांबरोबरच देवी अर्थात काली, लक्ष्मी, सरस्वती ही पूजनीय आहे.)

हे ही वाचा:

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!

सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीत तिघांना अटक, ३.१२ कोटींचा माल जप्त!

पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

पटना NIT मध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वातावरण गढूळ, विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन!

३. सुनान इब्न मजह १८८२ : यामध्ये असे सांगितले आहे, की “कोणत्याही स्त्रीने स्वतःचा किंवा दुसऱ्या स्त्रीचा विवाह ठरवू नये. जी स्त्री स्वतःचा विवाह स्वतः ठरवते (म्हणजे स्वतःच्या मना प्रमाणे वर निवडते) ती व्यभिचारी असते.” (आपल्याकडे पुराणकाळापासून स्वयंवराची, म्हणजे स्त्रीने स्वतःचा वर स्वतःच्या पसंतीने निवडण्याची प्रथा आहे, आणि त्यासाठी कोणीही स्त्रीला कधीही व्यभिचारी ठरवले नाही.)

४. सुनान अन नसाई ५१२६ : यामध्ये असे म्हटले आहे, की, ‘जी स्त्री सुगंधी द्रव्य लावून बाहेर पडते जेणेकरून तिने लावलेल्या सुगंधाचा सुवास लोकांना येईल, तर अशी स्त्री व्यभिचारी असते.’

हे ही वाचा:

कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विजयांची संख्या आता जास्त, बांगलादेशला नमविले

पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?

अंबानींचा ‘अँटिलिया’ वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधला आहे: फरार आरोपी झाकीर नाईक!

आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

५. सहीह बुखारी ७०९९ : यामध्ये म्हटले आहे की, ‘जे राष्ट्र एका स्त्रीला शासक म्हणून स्विकारते ते कधीही यशस्वी होत नाही.’ (आपल्याकडे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पासून, ते थेट इंदिरा गांधींपर्यंत अनेक उत्कृष्ट शासक होऊन गेल्या.)

हुजूरपागा येथील मुलींच्या शाळेची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन करण्यात आली. स्त्रियांचा सन्मान, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे , मानाचे स्थान देणे, हे त्यांच्या शिक्षणाचे मूळ हेतू. त्या संस्थेच्या संस्थापकांचे आत्मे जिथे कुठे असतील, तिथे ते निश्चितच “ईद ए मिलाद”चा कार्यक्रम संस्थेत आयोजित केल्याने व्यथित असतील.

स्त्रियांना केवळ दुय्यमच नव्हे, तर अतिशय तुच्छतेची , अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मध्ययुगीन मागासलेल्या पंथाची शिकवण पुण्यातील मुलींना एका मान्यवर संस्थेत आज एकविसाव्या शतकात दिली जावी, हे दुर्दैव.

आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद ५१ (क) “मुलभूत कर्तव्ये”. यामधील – स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्याल प्रथांचा त्याग करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वीकारणे, प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे, हिंसाचाराचा त्याग करणे, अशा  कित्येक गोष्टी ह्या मध्ययुगीन पंथाच्या शिकवणुकीशी सर्वथा विसंगत आहेत. (हलाला प्रथा अजूनही चालू असणे, पृथ्वी चपटी असल्याचे अजूनही मानणे, गाई व अन्य पशु अत्यंत क्रूरतेने मारणे वगैरे). असे कार्यक्रम आयोजित करताना आपण मुलांना संविधानाशी विसंगत गोष्टींचा आदर करायला शिकवत आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल. उद्या जर “संविधान की पंथ” अशी परिस्थिती उद्भवली, तर हा पंथ त्याच्या अनुयायांना त्या पंथाशीच एकनिष्ठ राहायला शिकवतो, हे विसरून चालणार नाही.

ईश्वर सविता अनकाईकर यांना आणि संस्थेच्या संचालकांना सद्बुद्धी देवो. यापुढे असले कार्यक्रम आयोजित न केले जावोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना.

श्रीकांत पटवर्धन

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा