27 C
Mumbai
Tuesday, August 16, 2022
घरधर्म संस्कृती“इस्लाम, ख्रिश्चनांचा अपमान अपमान; हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय?”

“इस्लाम, ख्रिश्चनांचा अपमान अपमान; हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय?”

Related

भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरवर माता कालीला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले आहे. यावर वाद निर्माण झाल्यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक पंडित यांनी या मुद्द्यावर ट्विट केले आहे. ‘इस्लामचा आपमान हा अपमान मानला जातो. ख्रिश्चनांचा अपमान हा अपमान असतो. सिख लोकांचा अपमान देखील अपमान मानला जातो. मग हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे करणारी व्यक्ती हिंदू असेल तर आणखी सोपे आहे,’ असे ट्विट अशोक पंडित यांनी केले आहे.

निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ असून या पोस्टरमध्ये माँ कालीच्या एका हातात सिगारेट दाखवली असून एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. तसेच लीना मणिमेकलाई यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

हे ही वाचा:

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!

गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १५ जणांचा मृत्यू

पोस्टरमध्ये निर्मात्यांनी माता कालीचा अपमान केल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच लीना मणिमेकलाई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी लीना मणिमेकलाई यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा