28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरधर्म संस्कृतीअबूधाबीच्या मंदिराच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होणार

अबूधाबीच्या मंदिराच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होणार

Google News Follow

Related

अबुधाबीतील पहिल्यावहिल्या मंदिराच्या पायाभरणीचे काम पुढच्या महिन्यात पुर्णत्वास जाणार आहे.

या मंदिरात अनेक हिंदू देवदेवतांच्या मुर्ती असतील. या एकूण परिसरात विविध दालने असणार आहेत. यात पर्यटकांचे दालन, प्रार्थना केंद्र, वाचनालय, वर्ग, समाज केंद्र अशा विविध सोयी-सुविधा असतील. त्याबरोबरच खुले नाट्यगृह, मैदाने, बगिचे, विविध दुकाने, उपाहारगृहे अशा विविध सोयी असतील.

सध्या याच्या पायाभरणीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. पायाची उंची जमिनीपासून साडेचार मीटर पर्यंत बांधून झाली आहे. पुढच्या महिन्यापासून गुलाबी रंगाच्या वालुकामय दगडाच्या बांधकामाला सुरूवात होईल.

हे ही वाचा:

‘गरिबांना रेशनचा तांदूळ दिला तोही विकून खाल्लात’- सुनिल देवधर

पहिली ते आठवी, विना परीक्षा सारेच पास

ओपेककडून जगाला तेल दिलासा

प्रकल्प अभियंता अशोक कोंदेटी यांनी सांगितले की, मी या प्रकल्पाची प्रगती आणि गुणवत्ता तपासत आहे. या प्रकल्पाचा भाग असणे हे माझ्यासाठी भूषणावह आहे. ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे.

या प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट ओतण्यात आले होते आणि आता ते सिमेंट मजबूती पकडत आहे, ही चांगली गोष्ट असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

या पायात दोन बोगदे आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारा दगड भारतातून आणण्यात आला होता. तो दगड बसवण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. एप्रिल पर्यंत पायाभरणीचे काम पूर्ण होऊन जाईल.

राजस्थान आणि गुजरातच्या अनेक शिल्पकारांनी दगडात घडवलेल्या मुर्ती लवकरच अबुधाबीत दाखल होतील. त्यानंतर त्यांना संपूर्ण मंदिराच्या दर्शनी भागात लावले जाणार आहे. त्यावर अनेक पौराणिक कथां, परंपरा यांची शिल्पे असतील. या मंदिराची रचना शिल्पशास्त्रानुसार करण्यात येणार आहे.

या मंदिराच्या पायाचा दगड एप्रिल २०१९ मध्ये रचण्यात आला आणि डिसेंबर २०१९ पासून पायाभरणीच्या कामाला प्रारंभ झाला. हे मंदिर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा