31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारणराहुल गांधी यांना रायबरेलीची लढतही सोपी जाणार नाही!

राहुल गांधी यांना रायबरेलीची लढतही सोपी जाणार नाही!

भाजपने रचले चक्रव्यूह

Google News Follow

Related

काँग्रेसनेते राहुल गांधी यांना गेल्या निवडणुकीत अमेठीत पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भाजप त्यांना त्यांच्या नवीन मतदारसंघात लक्ष्य करणार आहे. भाजपने यंदा येथून स्थानिक नेते आणि माजी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री दिनेशप्रताप सिंह यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात आतापर्यंत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरलेली नाहीत. मात्र राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी भाजप यावरही जोर देत आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना मैदानात उतरवले होते. मात्र ते सोनिया गांधी यांच्या विरोधात पराभूत झाले होते. मात्र त्यांनी सोनिया गांधी यांचे मताधिक्य अर्धे केले होते. त्यानंतर भाजपने त्यांना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री केले होते.

दिनेश प्रताप सिंह हे आमदार असल्याने त्यांची ग्रामपंचायतींवर मजबूत पकड आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत रायबरेलीतील अनेक प्रमुख काँग्रेसनेते आता भाजपच्या सोबत आहेत. प्रमुख काँग्रेसनेते राहिलेले अखिलेशकुमार सिंह यांची मुलगी अदिती आता रायबरेलीतील भाजपच्या आमदार आहेत. रायबरेलीत पाच विधानसभा मतदारसंघ असून त्यातील एक वगळता अन्य ठिकाणी सपाचे आमदार आहेत.

हे ही वाचा:

२० मिनिटांसाठी बनवला बॉम्बची धमकी दिलेल्या ईमेलचा आयडी!

‘तुम्हाला आधी रायबरेलीतून विजय मिळवावा लागेल’

‘श्री समर्थ’ च्या सुवर्णमहोत्सवी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला दमदार प्रतिसाद

कोलकात्याने पराभूत केल्याने मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडण्याची भीती

आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाला सामाजिक समीकरणांवर मते मिळाली आहेत. मात्र आता भाजप राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी या समीकरणावर काम करते आहे. अन्य समाजासह ओबीसी समाजाचा मोठा हिस्साही त्यांच्या सोबत असेल.राहुल गांधी वायनाड व रायबरेलीतून लढणार असल्याने ते कोणत्या मतदारसंघावर पाणी सोडणार, हा मुद्दाही प्रचारात आणला जातोय.

दर निवडणुकीत भाजपची ताकद वाढती
भाजपने सोनिया गांधींविरोधातही प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद वाढवली आहे. भाजपला सन २००९मध्ये तीन टक्के मते मिळाली होती. ती सन २०१४मध्ये वाढून २१ टक्के झाली. सन २०१९मध्ये ती ३८ टक्क्यांवर पोहोचली. हा मतटक्का आणखी १२ टक्के वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सोनिया गांधी यांच्या विजयातील अंतर सतत कमी होत आहे, असा दावा भाजप करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा