26 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरधर्म संस्कृतीन्या. शमीम अहमद म्हणाले, देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हावा!

न्या. शमीम अहमद म्हणाले, देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हावा!

गोहत्येसंदर्भातील एका प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायाधीश अहमद यांनी हिंदू धर्मातील गाईचे महत्त्व विषद केले.

Google News Follow

Related

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आणि त्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. गाईला राष्ट्रीय संरक्षित प्राणी म्हणून घोषित करा असे सांगतानाच गाईची हत्या करणारे किंवा हत्या करण्यास प्रवृत्त करणारे हे नरकात जातील असेही निरीक्षण न्यायालय नोंदविते. महत्त्वाचे म्हणजे हे न्यायाधीश आहेत, शमीम अहमद.

गोहत्येसंदर्भातील एका प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायाधीश अहमद यांनी हिंदू धर्मातील गाईचे महत्त्व विषद केले. मोहम्मद खालीक याने गाईची हत्या केली होती, त्यासंदर्भात त्याचा खटला मागे घेण्यात यावा अशी त्याची मागणी होती, पण न्यायालयाने ती फेटाळली. त्यानंतर न्या. अहमद यांनी जी निरीक्षणे नोंदविली ती महत्त्वाची ठरतात.

ते म्हणाले की, हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे. तिची जो हत्या करतो तो नरकात जातो. भारतात सर्व धर्मांचा सारखाच आदर केला जातो. त्यामुळे सगळ्यांनीच तो आदर ठेवला पाहिजे. गाय हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे आणि तशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तिचे संरक्षण हे अगत्याचे ठरते.

 

हे ही वाचा:

अटक वारंट घेऊन पोलीस धडकले इम्रान खानच्या घरी.. कधीही होऊ शकते अटक

लोकांचा ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी भाजपाची यात्रा

महामार्गाच्या कडेला तुम्हाला पाहायला मिळणार ‘बाहुबली’

भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले

पंचगव्याच्या माध्यमातून गाय आपल्याला सर्व प्रकारचे पदार्थ देत असते. दूध, तूप, दही, गोमुत्र आणि शेण या पाचही गोष्टी आपल्या सगळ्यांनाच उपयोगी असतात.

अहमद यांनी निरीक्षण नोंदविले की, गाय ही विविध देवीदेवतांसोबत आपण पाहतो. इंद्रदेवासोबत कामधेनू असते तर देवांचे देव महादेव यांचे दर्शन घेण्यापूर्वी आपण नंदीचे दर्शन घेतो. भगवान श्रीकृष्णाचे आणि गाईंचे अनोखे नाते आहे. या गाईचे चार पाय म्हणजे चार वेद आहेत. तिची शिंगेही देवाचे रूप आहेत. तिचा चेहरा म्हणजे सूर्य आणि चंद्र आहेत. तिचे खांदे हे अग्निदेवतेचे रूप आहेत.

न्या. अहमद मत मांडतात की, महाभारतात पितामह भीष्म यांनी गाईला माता हा दर्जा दिलेला आहे. सगळ्या मानवजातीला ती दूध देते आणि तेही कायम. त्यामुळे ती अवघ्या जगताची माता आहे.

न्यायालयाने असेही मत नोंदविले की, १९ आणि २०व्या शतकात गाईंच्या संरक्षणाची मोहीम राबविण्यात आली. सरकारने गोहत्या बंदी तातडीने करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायदा अमलात आणावा आणि गाईला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,883चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा