26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरराजकारणलोकांचा 'आशीर्वाद' घेण्यासाठी भाजपाची यात्रा

लोकांचा ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी भाजपाची यात्रा

मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संपर्क

Google News Follow

Related

भाजप आजपासून मुंबईत आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहे. मुंबईतील सर्व ६ लोकसभा मतदारसंघात आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष रविवारपासून मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी टप्प्याटप्प्याने यात्रा सुरू करणार असल्याचे भाजपचे मुंबई विभाग प्रमुख आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

आशिर्वाद यात्रा तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये ५ मार्च रोजी लोकसभेच्या २ जागांवर, ९ रोजी २ लोकसभेच्या आणि ११ मार्च रोजी २ लोकसभेच्या जागांवर आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. पक्षाचे नेते लोकांशी संपर्क साधण्यासाठी महत्त्वाच्या मंदिरांना आणि इतर ठिकाणी भेट देणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेना यांनी मुंबईतील प्रत्येकी तीन मतदारसंघ जिंकले होते . भाजपने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य जागा जिंकल्या तर शिवसेनेने मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम जागा जिंकल्या होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष शिवसेना यांनी मुंबईत प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या. भाजपने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य जागा जिंकल्या होत्या. मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेने विजय मिळवला होता .

हे ही वाचा :

९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…

विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य

सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध

एका मागून एक तीन भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तरकाशी हादरले

मुंबईतील शिवसेनेच्या तीन खासदारांपैकी मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई उत्तर पश्चिम खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, ज्यांना निवडणूक आयोगाने अलीकडेच मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा