25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरधर्म संस्कृतीसनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

सनी लिओनीच्या त्या गाण्यात होणार बदल

Related

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे ‘मधूबन मे राधिका नाचे’ हे गाणे वादात सापडले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचे बोल आणि नाव बदलणार असल्याचे सारेगामा या संगीत लेबलने नुकतेच घोषित केले आहे. राधा ही पूजनीय असून त्या गाण्यावर अश्लील नाच केल्याचे लोकांचे म्हणणे आहे, त्यामुळे लोकांकडून या गाण्याला विरोध आहे. या गाण्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या गाण्याच्या व्हिडीओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला होता. तसेच अभिनेत्रीने या गाण्याबद्दल माफी मागावी आणि तिचे ‘मधुबन’ गाणे तीन दिवसांत मागे घ्यावे, अन्यथा तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

नरोत्तम मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या या इशाऱ्यानंतर सारेगामाने सोशल मीडियावरून अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या तीन दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल.

हे ही वाचा:

‘खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चालले नसते’

सास भी…मधील बहु बनली सासु!

दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?

…म्हणून भोजपुरी अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या

सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे २२ डिसेंबरला रिलीज झाले. त्यानंतर काही कालावधीतच लोकांनी तिला यावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या गाण्यात सनी ज्या पद्धतीने नाचत आहे आणि ते आक्षेपार्ह असल्याचे लोकांनी म्हटले. राधा आमच्यासाठी पूजनीय असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही म्हटले.

‘मधुबन में राधिका नाचे’ याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केले असून हे गाणे मोहम्मद रफीच्या १९६० मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावर आधारित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा