28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरधर्म संस्कृतीमहर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उदघाटन

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उदघाटन

२०० व्या जयंतीनिम्मित वर्षभर चालणार सामाजिक उपक्रम

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज   १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानामध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करणार आहेत. महर्षी दयानंद सरस्वती याबद्दल संबोधन करणार आहेत. महर्षी दयानंद यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त हे संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या सोहोळ्याचे उदघाटन करतील , असे पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदनात म्हंटले आहे. बारा फेब्रुवारी १८२४ मध्ये जन्मलेले महर्षी दयानंद सरस्वती हे एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन प्रचलित असलेल्या सामाजिक विषमतेचा सामना करण्यासाठी आर्य समाजाची स्थापना केली.

 

देशाच्या संस्कृतीत आणि सामाजिक प्रबोधनात आर्य समाजाने सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर विशेष भर देऊन फार महत्वाची भूमिका बजावली आहे.  पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे की , महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्मदिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे आर्य समाजाच्या सकारात्मक गुणांची अत्यंत आनंदी पद्धतीने घोषणा करणे हे मुख्य उद्देश आहे. महर्षी दयानंद यांचे कार्य जगासमोर आणून आपल्या देशाचे यामुळे नाव मोठे होईल.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपला देश जगाच्या नकाशावर कशा प्रकारे मोठा होईल याचा विचार सतत करत असतात. असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच अशा उपक्रमांचे नेतृत्व करत असतात. महर्षी दयानंद यांची जयंती साजरी करणे म्हणजेच महर्षीं यांच्या जीवनाविषयी जवळून जाणून घेऊन त्यातून लोकांना , समाजाला बरेच काही शिकण्यासारखे आहे असेही पुढे निवेदनात म्हंटले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा